भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयरावेर

रावेर मधून ठकसेन पाटील यांची बाजी; जगदीश बढे पराभूत !

जळगाव, मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी | जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीचा रावेर तालुक्यातील लढतीकडेही जिल्ह्याचे लक्ष लागून होते बिनविरोध होण्याची शक्यता असतात झालेल्या लढतीत ठकसेन पाटील यांनी बाजी मारली आहे.

सुरवातीला रावेर सोसायटी मतदारसंघातून जिल्हा दूध संघावर संचालक असणारे जगदीश बढे त्यांच्या विरूध्द दोन्ही उमेदवारांचे अर्ज बाद ठरत बढे हे बिनविरोध निवडून येणार अशी शक्यता असतांना चिनावल येथील ठकसेन पाटील यांनी या भाजपच्या शेतकरी पॅनल मधून रिंगणात उडी घेतली. त्यांना खोटे दाखल्यांच्या कारणामुळे जिल्हा दुध संघात निवडणूक लढविण्यासाठी त्यांना मज्जाव करण्यात आला. त्यामुळे नाशिक येथील सहकार आयुक्त दुध व सहकार न्यायालयात दाद मागत यात ठकसेन पाटील यांना निवडणूक लढविण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिल्याने येथे जगदीश बढे व त्यांच्यात लढत झाली.

मतमोजणीत ठकसेन पाटील यांना २६६ तर जगदीश बढे यांना १७० इतकी मते मिळाली. यामुळे ठकसेन भास्कर पाटील हे ९६ मतांनी विजयी झाले. निवडणुकी दरम्यान जगदीश बढे यांच्यावर शेतकरी विकास पॅनलतर्फे आमदार मंगेश चव्हाण यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांनी एजन्सी देण्याच्या नावाखाली औरंगाबाद येथील गोपीचंद पाटील यांच्याकडून दोन लाख रूपये घेतल्याचा आरोप केला. तर बढे यांनी ठिबक संचासाठी मालाचे हे पैसे घेतल्याचे प्रतिउत्तर दिले होते. यामुळे ही लढत आणखी लक्षवेधी बनली होती.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!