नववधूने पाठविला देशसेवेसाठी “सिन्दुर” कर्तव्याला प्राधान्य, पाच तारखेला लग्न, दुसऱ्याच दिवशी पाचोऱ्याचा जवान सीमेवर
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | दि. ५ मे रोजी विवाह झाला,आणि सुटीवर आलेल्या जवानांना भारत सरकारने युद्धजन्य परिस्थितीमुळे सीमेवर परत बोलावले आहे. यात पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील जवान मनोज ज्ञानेश्वर पाटील यांनाही बोलावणे आले. त्यांचा परवा दि. ५ मे रोजी विवाह झाला, मात्र देशकर्तव्याला प्राधान्य देत मनोज पाटील रवाना झाले.
भारत सरकारने ७ मे रोजी सिंदुर ऑपरेशन यशस्वी केले आहे. यामध्ये नऊ ठिकाणी हवाई मारा करत पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला असून भारत आणि पाकिस्तान मध्ये कोणत्याही वेळेला युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते यामुळे जे जवान घरी सुट्टीसाठी आले होते अशा सर्व जवानांना सीमेवर बोलवण्याचे आदेश प्राप्त झाले.
यामध्ये पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे गावातील असलेल्या मनोज ज्ञानेश्वर पाटील यांचा चि. सौ. का. यामिनी हिच्याशी नुकताच ५ मे रोजी विवाह संपन्न झाला होता. परंतु विवाह झाल्यावर तात्काळ त्यांना सेवेमध्ये रुजू होण्याचे आदेश आले आहेत. मनोज याने आपल्या अर्धांगिनीला परत येण्याचा विश्वास देऊन देशाची सेवा करण्याचा मार्ग निवडला असून देशसेवेचे धाडस दाखवून पुन्हा आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी रवाना झाला आहे.
या धाडसी निर्णयाचे सर्वत्र परिसरात मनोज पाटील यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे. युद्ध होवु नये आणि जवान परत यावा म्हणून परमेश्वराला पार्थना करण्यात आली.
देशाच्या सुरक्षिततेसाठी जवान मनोज पाटील यास हळद फिटली नाही आणि मेहंदी मिटली नाही अशा स्थितीत कॉल येणे हा सर्वांनासाठी अभिमान वाटावा असा प्रसंग मोठा छातीवर दगड ठेऊन निर्णय घेण्याची वेळ होती. असल्याचे एकीकडे लग्न होऊन दोन दिवस होत माहिती अंगावरची हळद ओलीचं असताना मेहंदीही अजून सुकलेली नसताना नववधूला गावी ठेऊन देशाच्या सरहद्दीवर रवाना होणारा जवानाचे कौतुक होत आहे. पाचोरा रेल्वे स्थानकावर जवान मनोज पाटील यांस देशाच्या सरहद्दीवर रवाना करतांना आई, वडील आणि पत्नी, भाउसह इतरांचे अश्रू अनावर झाले होते.