मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार.. ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथील ग्रामपंचायत मध्ये भोंगळ कारभार सुरू असून वार्ड क्र. तीन मधील नागरिकांना सांडपाणी साचलामुळे होणाऱ्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिकांनी ग्रामपंचायतला लेखी तक्रार देऊन सुद्धा त्यांच्याकडे बीडिओ व विस्तार अधिकारी यांना पण तक्रार दिलेली होती तरी सुद्धा विस्तार अधिकारी व ग्रामसेवक यांनी कोणती ही दखल घेतलेली नाही.
चांगदेव ग्रामपंचायत वार्ड क्र.तीन वार्ड क्र.चार मधून सांडपाणी वार्ड क्र. तीन मध्ये येत आहे तरी ही ग्रामपंचायतने आश्वासन दिले होते की आम्ही पूर्ण गटारीचे बांधकाम करून सांडपाण्याचा विल्हेवाट लावून देऊ तरी सुद्धा सरपंच व ग्रामसेवक यांना गटारीची विचारपूस केली. असता सरपंच व ग्रामसेवक यांनी सांगितले होते की गटार मंजूर झालेली आहे गटारीचे तीन चार महिन्यात बांधकाम पूर्ण करून देऊ असे आश्वासन ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी दिले तरी आश्वासन पूर्ण केलेलं नाही अशी नागरिकांचं म्हणणं आहे.
परंतु आता पावसाळा चालू झाल्यामुळे तिथे वार्ड. क्र. चार व वार्ड. क्र. तीन येथील सांडपाणी येऊन साचत आहे आणि त्या साचलेल्या पाण्याचा दुर्गंध व तिथे झाडे झुडपे व गवत वाढल्याने नैसर्गिक जीव म्हणजेच साप विषारी किटकांचा वावर दिसतो गटारीचे पाणी पुढे जात नसल्याने तेथील नागरिकांना त्रास होत आहे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसत आहे त्यांना बाहेर जाण्यासाठी सुद्धा मार्ग नाही. व सांडपाणी साचून तिथे डास तयार होत आहेत या मुळे नागरिकांना मलेरिया जुलाब डेंगू अशा प्रकारचे आजार पसरत आहे. या मुळे ग्रामस्थांचा आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामपंचायत चांगदेव मधील सरपंच ग्रामसेवक सदस्य विस्ताराधिकारी किंवा पंचायत समिती बीडिओ किंवा जिल्हा परिषद सि ओ यांनी लक्ष देऊन नागरिकांना होणाऱ्या त्रासाचं निवारण करावे अशी मागणी चांगदेव ग्रामस्थांकडून केली जात आहे.

