भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

मेंढ्यांच्या गोल रिंगणाने “भूम” मध्ये “मुक्ताई” पालखीचे स्वागत! “मुक्ताई माऊलीं” च्या गगनभेदी नामघोषात भक्तिभावाने फुलांची उधळण

भूम ,मंडे टु मंडे न्युज | आदिशक्ती संत मुक्ताई आषाढी वारी पालखी सोहळ्याचे भूम येथे आगमन झाल्यानंतर एक अनोखा आणि भक्तिभावपूर्ण प्रसंग अनुभवास आला.पालखी आगमनाच्या क्षणी मेंढ्यांचे गोल रिंगण पार पडले.या अद्भुत दृश्याने सर्व वारकरी आणि ग्रामस्थ थक्क झाले.

पालखी सोहळ्याचा आज २४ वा दिवस असून, आज दुपारी पालखी सोहळ्याचा विसावा आष्टा (ता. भूम, जि. धाराशिव) येथे आहे. यानंतर रात्रभर मुक्काम जवळा (ता. परंडा, जि. धाराशिव) येथे होणार आहे.

वारीत सहभागी वारकरी मंडळींचा उत्साह दिवसेंदिवस वाढत चालला आहे. “जय मुक्ताई माऊली!” च्या गगनभेदी जयघोषात पालखी पुढे सरकत आहे. ठिकठिकाणी ग्रामस्थ व भाविक मंडळी भक्तिभावाने फुलांची उधळण, नामस्मरण व महाप्रसादाचे आयोजन करून पालखीचे स्वागत करत आहेत

ही वारी भक्ती, श्रध्दा आणि संस्कृतीचा संगम ठरतो आहे. हजारो वारकऱ्यांची नित्यनेमाने होणारी उपस्थिती आणि स्थानिक ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग यामुळे यंदाचा सोहळा विशेष उठावदार ठरत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!