भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

विशेष दामिनी पथकाने तिकीट तपासणी करीत असताना “तोतया टीसी” ला रंगेहात पकडले

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | तोतया तिकीट निरीक्षक काशी एक्सप्रेस या रेल्वे गाडीत तपासणी करीत असताना त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई
महिलांची सुरक्षितता व रेल्वे गाड्यांमध्ये शिस्तबद्धता
रहावी या साठी भुसावळ रेल्वे विभागात कार्यरत असलेल्या विशेष दामिनी पथकाने शुक्रवारी मुंबईकडे जात असलेल्या अप काशी एक्सप्रेसमध्ये भुसावळ ते मनमाड तपासणी दरम्यान १८ जुलै शुक्रवार रोजी केली. सदर आरोपीला दामिनी पथकाने मनमाड रेल्वे सुरक्षा बलाकडे सोपविण्यात आले.

भुसावळ रेल्वे विभागात कार्यरत असलेले दामिनी पथक नेहमी प्रमाणे तपासणी करीत असताना त्यांना काशी एक्सप्रेसमध्ये एक संशयित व्यक्ती रेल्वेच्या गणवेशात प्रवाशांची तिकीट तपासणी करताना आढळला. त्याची चौकशी केली असता चौकशी दरम्यान तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नव्हता तसेच त्याच्याकडे रेल्वे संदर्भात कोणतेही वैध ओळखपत्र अथवा अधिकृत कागदपत्र नव्हते. यामुळे दामिनी पथकाने तत्परता दाखवत त्या व्यक्तीस त्वरित ताब्यात घेत मनमाड स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाच्या ताब्यात दिले. रेल्वे सुरक्षा बल त्याच्यावर पुढील कारवाई करत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!