लैंगिक अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती, तरुणाला अटक
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वेळोवेळी केलेल्या लैंगिक अत्याचारातून ती गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी १९ जुलै शनिवार रोजी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी १५ वर्षीय अल्पवयीन मुलगीला गेल्या एक वर्षांपासून लग्नाचे आमिष दाखवून निखील लिलाधर कोळी (वय २० रा. मोहन टॉकीजजवळ, जळगाव) हा लैंगिक अत्याचार करीत होता. या नराधमाने पिडीत मुलीवर वेळोवेळी अत्याचार केले. त्या अत्याचारातून पिडीत मुलगी ही पाच महिन्याची गर्भवती असल्याचे १८ जुलै रोजी उघडकीला आले.
या संदर्भात पिडीत मुलीच्या आईने शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून शनीवार १९ जुलै रोजी रात्री १० वाजता आरोपी निखील कोळी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले हे करीत आहे.


