भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

पशुवैद्यकीय अधिकारी घरात मृतावस्थेत आढळून आल्याने यावल मध्ये खळबळ

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |यावल मधून एक खळबळजनक घटना समोर आली. यावल गुरांच्या दवाखान्यात प्रभारी तसेच पाडळसा येथे कार्यरत असलेले पशु वैद्यकीय  अधिकारी घरात मृतावस्थेत आढळून आल्याने यावल शहरात खळबळ उडाली आहे. घरातून दुर्गंधी येत असल्याने या बाबत पोलिसाना माहिती कळविण्यात आलेवर पोलिसांनी घराची तपासणी केली असता त्यांना पशु वैद्यकीय  अधिकारी रतनलाल छोटूराम भगुरे वय ४८ हे मृतावस्थेत आढळून आले.

अधिक वृत्त असे की, पशुधन अधिकारी रतनलाल भगुरे हे मूळचे परभणीमधील सेलू येथील रहिवाशी असून ते यावल गुरांच्या दवाखान्यात प्रभारी असून ते यावल तालुक्यातील पाडळसा येथे कार्यरत होते.पशुअधिकारी भगुरे हे यावल शहरातील पांडुरंग सराफ नगर मधील आत्माराम गुरूजी यांच्या  घरात एकटेच राहत होते. ते यावल गुरांच्या दवाखान्यात प्रभारी तसेच पाडळसा येथे कार्यरत होते. दरम्यान, गेल्या तीन ते चार दिवसांपासून ते कोणालाच दिसून आले नव्हते.

त्यांच्या घरातून आजू बाजूचे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी सुटल्याने परिसरात व शेजारील रहिवाशांना संशय आला. त्यांनी या संदर्भात यावल पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घर उघडून पाहिले असता, पशुअधिकारी रतनलाल भगुरे हे मृत अवस्थेत आढळून आले.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून, घटनेचा तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून ,त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ? या बाबत अनेक तर्क वितर्क मांडले जात आहेत. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!