भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसावदा

“तो” व्यावसायिक कोण? सावदा परिसरात कथित आयकर छापेमारीची रंगलीय चर्चा !

सावदा, ता. रावेर | मंडे टु मंडे न्यूज || रावेर तालुक्यातील लहान वाघोदा (वाघोदा खुर्द) येथील एका बड्या व्यावसायिकाच्या व्यवसायाच्या ठिकाणी आणि निवासस्थानी आयकर विभागाने छापेमारी केल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे. लहान वाघोदा, निंभोरा, फैजपूर रोड आणि सावदा या चार ठिकाणी एकाच वेळी कारवाई झाल्याचे सांगितले जात असल्याने व्यापारी वर्गासह परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र, हा व्यावसायिक नेमका कोण? आयकर विभागाच्या कथित कारवाईमागचे कारण काय? याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने चर्चांना उधाण आले आहे.

चार ठिकाणी एकाच वेळी कारवाई झाल्याची चर्चा

लहान वाघोदा येथील संबंधित व्यावसायिकाच्या आस्थापना आणि निवासस्थानासह इतर तीन ठिकाणी आयकर विभागाने तपासणी केल्याची चर्चा आहे. या चारही ठिकाणांचा एकमेकांशी नेमका काय संबंध आहे, संबंधित आस्थापना एकाच व्यावसायिकाच्या आहेत की वेगवेगळ्या व्यक्तींशी संबंधित आहेत, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.

कोट्यवधींच्या रकमेबाबत तर्कवितर्क

या कथित कारवाईच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधी रुपयांच्या रकमेबाबतही विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात किती रक्कम आढळली, कोणती कागदपत्रे किंवा अन्य बाबी तपासण्यात आल्या, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे चर्चेत असलेल्या दाव्यांची सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नाही.

काय होते? आठ दिवस चर्चा होते, अन् लोक विसरून जातात….

या प्रकरणाबाबत व्यावसायिकांकडून असेही सांगितले जाते की, काय होते? आठ दिवस चर्चा होते, अन् लोक विसरून जातात……. असे व्यावसायिक बोलत असल्याचेही सांगितले जाते.

प्रकरण दडपले जात असल्याचीही चर्चा!

या संपूर्ण प्रकरणाबाबत अधिकृत माहिती समोर येत नसल्याने परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. काहींकडून हे प्रकरण दडपले जात असल्याचा दावा केला जात असला, तरी त्यालाही अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि कथित कारवाईबाबत माहिती द्यावी, अशी मागणी परिसरातून होत असल्याचे सांगितले जात आहे.

अधिकृत खुलाशाकडे लक्ष

आयकर विभागाने प्रत्यक्षात कारवाई केली का, केली असल्यास ती कोणत्या कारणासाठी करण्यात आली, संबंधित व्यावसायिक कोण आहे, तपासणीत काय आढळले आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रश्नांची उत्तरे अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच स्पष्ट होणार आहेत. दरम्यान,याकडे लहान वाघोदा, निंभोरा, फैजपूर आणि सावदा परिसराचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!