भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्रीडारावेरशैक्षणिक

सावदा येथील आ.गं. हायस्कूल चा विद्यार्थी विवेक कोल्हे ची “राष्ट्रीय शालेय स्क्वॅश” चॅम्पियनशिप साठी महाराष्ट्र संघात निवड

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सावदा येथील श्री आ . गं . हायस्कूल व श्री ना .गो . पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा 12 वी science चा विद्यार्थी विवेक कोल्हे यांची 2 डिसेंबर 2025 व 3 डिसेंबर 2025 रोजी उंड्री, पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय स्क्वॅश चॅम्पियनशिप मधून यांची निवड झाली .

1 1 व 1 3 डिसेंबर 2025 रोजी इंदूर, मध्य प्रदेश येथे होणाऱ्या १९ वर्षांखालील राष्ट्रीय शालेय स्क्वॅश चॅम्पियनशिपसाठी महाराष्ट्र संघात विवेकची निवड झाली आहे .

ही विद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. तसेच सांघिक गटात देखील मुलांच्या संघाने कांस्यपदक प्राप्त केले. या संघात देखील विवेक कोल्हे यांचा समावेश होता.त्याच्या या यशामध्ये त्याचे वर्गशिक्षक श्री मनोज यशवंत महाजन व त्याचे क्रीडाशिक्षक श्री अनिल भास्कर नेमाडे यांचा अत्यंत मोलाचा सहभाग आहे विवेक यांच्या सोबत त्याचे वर्गशिक्षक व क्रीडाशिक्षक यांचे देखील सर्वत्र कौतुक होत आहे

विवेक चे सर्व स्तरातूनकौतुक होत आहे विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्री पीजी भालेराव सर पर्यवेक्षक आदरणीय श्री संजय महाजन सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी रुंद यांनी विवेक चे कौतुक केलेले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!