भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

झिपरू अण्णा महाराज पुण्यतिथी नंतर वाकी नदी स्वच्छतेला वेग. बातमीची दखल; नगरपरिषदे कडून साफसफाई मोहिमेला प्रारंभ

नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ.दीपक लोखंडे |नशिराबादचे ग्रामदैवत संत शिरोमणी श्री झिपरू अण्णा महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव नुकताच भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला. उत्सवादरम्यान पंचक्रोशीसह विविध भागांतून हजारो भाविकांनी नशिराबाद येथे उपस्थित राहून महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.

मात्र, मंदिरालगत वाहणाऱ्या वाकी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर साचलेली घाण, कचरा आणि झाडे झुडपांमुळे नदीच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यासंदर्भात ग्रामस्थ आणि भाविकांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली होती.

दरम्यान, ७ मे रोजी ‘प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत नशिराबाद नगरपरिषदेकडून वाकी नदी स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. सध्या नदीच्या दोन्ही काठांवरील झाडाझुडपे, कचरा आणि साचलेली घाण हटविण्याचे काम सुरू असून पुढील आठ दिवसांत नदी पात्रातील घाण काढण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी दिली.

वाकी नदी परिसरातील अस्वच्छतेमुळे दुर्गंधी व आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण होते. पुण्यतिथी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. नगरपरिषदेकडून सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे नागरिक आणि भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडून ही मोहीम केवळ उत्सवापुरती मर्यादित न ठेवता नदी स्वच्छता आणि परिसर सौंदर्यीकरणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!