भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Bhusawal

भुसावळ-दादर खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून आता सहा दिवस धावणार..बोईसर, डहाणू रोड हे दोन नवे थांबे

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज | प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने भुसावळ-दादर खान्देश एक्सप्रेस (गाडी क्र. १९००३/१९००४) च्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी १ ऑगस्ट २०२६ पासून शुक्रवार वगळता आठवड्यातून ६ दिवस (सोमवार ते गुरुवार, शनिवार आणि रविवार) धावेल.

पूर्वीचे स्पेशल तिकीट दर रद्द करण्यात आले आहेत. आता ती सामान्य एक्सप्रेस म्हणून धावणार असल्याने प्रवाशांच्या तिकीट दरात २५ ते ३० टक्क्यांची बचत होईल. प्रवाशांच्या सोयीसाठी या गाडीला आता बोईसर आणि डहाणू रोड येथे अतिरिक्त थांबे देण्यात आले आहेत. पश्चिम रेल्वेने दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेसच्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

गाडी क्रमांक १९००३/१९००४ दादर-भुसावळ-दादर खान्देश एक्सप्रेस आता आगामी १ ऑगस्टपासून आठवड्यातून ६ दिवस धावणार आहे. याशिवाय प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने भोईसर आणि डहाणू रोड हे दोन अतिरिक्त थांबे मंजूर केले आहेत.

असे असेल नवीन वेळापत्रक (१ ऑगस्टपासून):
गाडी क्र. १९००३ (दादर – भुसावळ)
ही रेल्वे दादरहून मध्यरात्री १२:०५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११:२३ वाजता जळगावला पोहोचेल. ही गाडी दर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी धावेल (शुक्रवार वगळून).

गाडी क्र. १९००४ (भुसावळ – दादर)
परतीच्या प्रवासात ही रेल्वे भुसावळहून सायंकाळी ०५:४० वाजता सुटेल. त्यानंतर सायंकाळी ०६:०५ वाजता जळगाव स्थानकावर येईल आणि दादरसाठी रवाना होईल. ही गाडी देखील सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी धावणार आहे.फेऱ्यांमध्ये झालेली वाढ आणि नवीन थांब्यांमुळे मुंबई-खान्देश दरम्यान प्रवास करणाऱ्या नोकरदार, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!