भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

आणखी एक भोंदूबाबा : मध्यरात्री जादूटोण्याच्या नावाखाली विचित्र विधी करत महिलेसोबत अमानुष कृत्य

मुंबई, मंडे टु मंडे न्युज | राज्यात अशोक खरात सारख्याच भोंदूबाबांचे नवनवे अनेक कारनामे उघडकीस येत असतानाच रायगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रायगडमध्ये एका भोंदूबाबाने महिलेवर मध्यरात्री जादूटोण्याच्या नावाखाली विचित्र विधी करत अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या मुळे मोठी खळबळ उडाली आहे. पीडित महिला ही घरगुती वादातून बाहेर निघण्यासाठी या भोंदू बाबांकडे गेली होती.

रायगड जिल्ह्यात आणखी एक भोंदू बाबाचा अमानुष प्रकार उघडकीस आला आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांवर अत्याचार होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आल्याने रायगड जिल्हा हादरला आहे. खालापूर तालुक्यात घडलेल्या या घटनेत कळंबोली येथील अब्दुल रशीद उर्फ बाबाजान या भोंदू बाबाने एका विवाहित महिलेची फसवणूक करून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सांताक्रूझ येथील पीडित महिला वैवाहिक अडचणींमुळे मानसिक तणावात होती. पतीच्या प्रेयसीमुळे निर्माण झालेल्या वादातून मार्ग काढण्यासाठी ती ओळखीतील या भोंदू बाबाकडे गेली होती. आरोपी भोंदूबाबाने ‘उपचार’ करण्याचे आमिष दाखवत तिचा विश्वास संपादन केला. प्रथम तिला माहेरी बोलावून घेतल्यानंतर खालापूर तालुक्यातील महड परिसरात नेले. तिथे मध्यरात्री जादूटोण्याच्या नावाखाली विचित्र विधी करत महिलेवर अमानुष कृत्य केल्याचे समोर आले आहे. काही काळानंतर कोणताही परिणाम न झाल्याने आणि स्वतःची फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यावर पीडित महिलेने पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली.

तक्रारीनंतर खालापूर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून घेत रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी आरोपीला कळंबोली येथून अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

पिडीत महिला आपल्या पतीच्या प्रेयसीबाबत उपाय करण्यासाठी भोंदूबाबाकडे गेली होती. या वेळी उपाय करण्याच्या बहाण्याने मध्यरात्रीच्या वेळी अघोरी पूजा केली. त्याने महिलेच्या शरिराला स्पर्ष करत लैंगिक अत्याचार केल्याचे पीडित महिलेने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!