भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

दिलासा;आज ९०४ रुग्ण कोरोना बाधित तर १०३७ रुग्णाची कोरोनावर मात

Monday To Monday NewsNetwork।

जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ९०४ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १०३७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज सोळा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर – १४०, जळगाव ग्रामीण-४१, भुसावळ- ९४, अमळनेर-२४, चोपडा-७३, पाचोरा-४४, भडगाव-१५, धरणगाव-३४, यावल-६०, एरंडोल-५७, जामनेर-९९, रावेर-५३, पारोळा-३२, चाळीसगाव-६३, मुक्ताईनगर-४५, बोदवड-२८, इतर जिल्ह्यातील-०४ असे एकुण ९०४ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १२३ हजार ८४४ पर्यंत पोहचली असून १११ हजार २५७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज सोळा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २२१६ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर १०३७१ रुग्ण सध्या उपचार घेताय. दिलासादायक बाब म्हणजे जळगाव जिल्ह्यात आज ॲक्टीव रूग्णांची संख्याही १४९ ने कमी झाली तसेच बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या १३३ ने जास्त आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!