भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

हातावर पोट भरणाऱ्यांना पॅकेज द्या, मगच लॉकडाऊनचा विचार करा– भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई (विशेष प्रतिनिधी)। राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली होती. राज्यात कडक लॉकडाऊन लावावा का याबाबत चर्चा बैठकीत करण्यात आली.  भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीनंतर पक्षाची भूमिका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडली. 

कोरोना संसर्गाला थोपवण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय स्पष्ट आणि सविस्तर भूमिका मांडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिशा कडक लॉकडाऊनच्या दिशेने आहे. परंतु फडणवीस यांनी घाईघाईने लॉकडाऊन केला तर उद्रेक होईल. अशी भूमिका घेतल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. हातावरचे पोट भरणाऱ्यांना नेमकं काय देता येईल हे पाहू असं अजित पवारांनी बैठकीत म्हटलं आहे. अजित पवार यांची इच्छाशक्ती असेल तर ते गरीब कुटूंबातील लोकांना मदत करू शकतात.. अडचणींचा विचार केल्याशिवाय लॉकडाऊन करता येणार नाही अशी भूमिका आम्ही मांडली आहे. तरी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला आमचं समर्थन आहे. असेही पाटील यांनी म्हटले आहे.

कोरोना नियंत्रणात आणताना सर्वसामान्य लोकांचा जीव जाणार नाही याची काळजी घ्यावी. सर्वसामान्यांचा पोटाचा विचार करावा लागेल, अशा सूचनाही पाटील यांनी केली आहे. दोन दिवसात मुख्यमंत्री विचार करून निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. लॉकडाऊन केल्याशिवाय कोरोनावर नियंत्रण येणार नाही 14 दिवसांचा लॉकडाऊन लावा म्हणणाऱ्या तात्याराव लहानेंच काय जातंय. असा टोलाही पाटील यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!