पन्नास हजाराची लाच घेणाऱ्या पोलिस निरीक्षक वारे यांच्या घरात सापडले २५ लाखाचे घबाड
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रुपये ५० हजारांची लाच घेताना अटक झालेल्या ज्ञानेश्वर लक्ष्मण वारे,वय – 49 वर्ष, पोलीस निरीक्षक, नवापूर पो.स्टे. रा. फ्लॅट नंबर 6, बी विंग, आशर इस्टेट, उपनगर, नाशिक रोड, नाशिक. याना काल दि.२४ एप्रिल बुधवार रोजी एसीबी च्या पथकाने रंगेहाथ अटक केली, एसीबी च्या पथकाने त्यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या घरात २५ लाख ८७ हजार रुपयांचे मोठे घबाड सापडल्याने मोठी खळबळ उडाली. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे याना आज दि.२५ एप्रिल गुरुवार रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांना २८ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण
यातील तक्रारदार यांचे यांचेवर सोनगड पोलीस स्टेशन, जिल्हा तापी, राज्य – गुजरात येथे गुन्हा रजिस्टर नंबर ५८३/२०२३ प्रमाणे प्रोव्हीबिशन चा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचे तपासकामी (एल. सी. बी. तापी, गुजरात राज्य) पोलीसांचे पथक नवापूर पोलीस स्टेशन, जिल्हा नंदुरबार येथे आले त्यावेळी नवापूर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर वारे यांनी सोनगड पोलीस स्टेशन, जिल्हा तापी राज्य गुजरात चे गुन्ह्यामध्ये मध्यस्थी करून अटकेपासून बचाव होणे कामी मदत केल्याचे मोबदल्यात त्यांनी तक्रारदार यांचे मित्र यांच्याकडे तक्रारदार यांच्यामार्फत २,५०,०००/- रुपये लाचेची ची मागणी केली होती.त्यावेळी तक्रारदार यांनी भीतीपोटी दि ५/३/२०२४ रोजी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना १,००,०००/- रुपये लाच म्हणून दिले होते त्यानंतर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी १,५०,०००/- रुपये अधिक लाचेची मागणी करून दिनांक २४/४/३०२४ रोजी लाचेची मागणी पडताळणी दरम्यान तडजोड अंति ५०,०००/- रुपये लाचेची ची मागणी करून पंचा समक्ष मागणी केलेली लाचेची रक्कम ५०,००० रुपये स्वीकारले आहे. त्यांचेवर नवापूर पोलीस स्टेशन, जिल्हा नंदुरबार येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटकेच्या समर्थनार्थ गावकऱ्यांचा पोलिस स्टेशन समोर जल्लोष
ज्ञानेश्वर वारेच्या अटकेची बातमी कळताच गावकऱ्यांनी नवापूर पोलीस ठाण्यात कारवाईच्या समर्थनार्थ मोठी गर्दी केली. वारे विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.विशेष म्हणजे वारे या अधिकाऱ्याला अटक केल्याने गावकऱ्यांनी पोलीसस्टेशन समोरच अटकेच्या समर्थनार्थ मोठा जल्लोष केला. खोटे गुन्हे दाखल करून लाच घेत असल्याचाही या अधिकाऱ्यावर आरोप होता.