महाराष्ट्र

सोनं-चांदी झालं स्वस्त, पण नक्की किती स्वस्त झालं…

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. सोन्याच्या दरात घसरण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सोन्याच्या दरात वाढ होत होती. पण नक्की किती रुपयांनी सोनं-चांदी स्वस्त झालं. हेही पाहण महत्वाचं आहे.आता MCX वर सोन्याच्या दरात घसरण होत आहे. आज सोन्याच्या दरात 180 रुपयांची घसरण झालीय. सध्या सोनं 70,800 रुपयांच्या आसपास पोहोचले आहे.त्याच प्रमाणे चांदीचे आहे.

MCX वर चांदीच्या दरातही 300 रुपयांची घसरण
दरम्यान, एकीकडं सोन्याच्या दरात घसरण होत असताना दुसरीकडं चांदीच्या दरातही घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. MCX वर चांदीच्या दरातही 300 रुपयांची घसरण झालीय. सध्या चांदीचे दर हे 80,260 रुपयांवर पोहोचले आहेत. सोन्यानं 73 हजार रुपयांची पातळी गाठली होती. आता मात्र, यामध्ये गसरण होऊन सोनं 71000 रुपयांचा आसपास आहे. बुधुवारी बाजारात सोनं 71,050 रुपये होतं. आज यामध्ये 180 रुपयांची घसरण झालीय. सध्या सोनं 70,800 रुपये प्रति तोळा आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!