Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावभडगाव

लग्नाचे आमिष दाखवून २४ वर्षीय तरुणीवर हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार करत फोटो आणि रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी

जळगाव. मंडे टु मंडे न्युज ||  लग्नाचे आमिष दाखवून २४ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिरडी, रोहिळे येथील मनोहर देवराम खोटरे याच्याविरोधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित मनोहर खोटरे याने तरुणीला लग्न करण्याचे आश्वासन देत भडगाव शहरातील दादाजी हॉटेल (लॉज) येथे नेले. तेथे तिच्या इच्छेविरोधात अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या प्रकाराचे फोटो आणि रेकॉर्डिंग करून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

ही घटना ८ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी भडगाव पोलिसांत संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रताप पाटील करीत आहेत.या प्रकरणातील पुढील तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!