Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावप्रशासन

जळगाव जिह्यातील पोलीस दलात महत्वपूर्ण मोठे फेरबदल! चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नव्या नियुक्त्या ; तात्काळ हजर होण्याचे निर्देश

जळगाव.मंडे टु मंडे न्युज || जळगाव जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय कारणास्तव महत्त्वपूर्ण फेरबदल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी आदेश जारी करत चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नव्या नियुक्त्या केल्या आहेत. या निर्णयामुळे आर्थिक गुन्हे शाखा, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (AHTU) तसेच शनीपेठ आणि बोदवड पोलीस ठाण्यांच्या प्रभारी पदांमध्ये बदल झाले आहेत.

पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक आशिष मधुकर लकांडे यांची बोदवड पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदावरून आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव येथे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर पोलीस निरीक्षक विशाल प्रभुलाल जयस्वाल यांची शनीपेठ पोलीस ठाण्यातून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या (AHTU) प्रभारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

याशिवाय पोलीस निरीक्षक नितीन सुदाम पाटील यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेची जबाबदारी होती. त्यांची आता शनीपेठ पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे, सहायक पोलीस निरीक्षक विवेकानंद दत्तात्रय राळेभात यांची बोदवड पोलीस ठाण्यातील दुय्यम अधिकारी पदावरून त्याच पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

माधुरी बोरसे, सागर शिंपी अतिरिक्त कार्यभारातून मुक्त

या फेरबदलांसोबतच सहायक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे यांना AHTU विभागाच्या प्रभारी अधिकारी पदाच्या अतिरिक्त कार्यभारातून मुक्त करण्यात आले आहे. त्या यापुढे मानव संसाधन विभाग, जळगाव येथे आपल्या मूळ नियुक्तीच्या ठिकाणी पूर्णवेळ कामकाज पाहणार आहेत. तसेच पोलीस उपनिरीक्षक सागर शिंपी यांनाही शनीपेठ पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदाच्या अतिरिक्त जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे.

तात्काळ हजर होण्याचे निर्देश

बदली व नियुक्ती करण्यात आलेल्या संबंधित अधिकाऱ्यांनी नव्या पदस्थापनेच्या ठिकाणी तात्काळ हजर राहून त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.

या प्रशासकीय फेरबदलांमुळे जळगाव जिल्हा पोलीस दलातील महत्त्वाच्या शाखा आणि पोलीस ठाण्यांच्या कामकाजाची जबाबदारी नव्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली असून, आगामी काळात त्यांच्या कामकाजाकडे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!