भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

ब्रेकिंग : बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी भाजपनेते संजय गरुड यांना सोलापूर मधून अटक

जळगाव, मंडे टु मंडे न्युज | भाजपनेते आणि १५ शाळांचे संचालक संजय गरुड यांना शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी सोलापूरमधून अटक करण्यात आली आहे. त्यांनी एकाच दिवसात १७७ शिक्षक व कर्मचाऱ्यांचे संशयास्पद शालार्थ आयडी तयार केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यांना नाशिक न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी मागितली जाणार आहे.

राज्यात खळबळ उडवणाऱ्या बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी एसआयटीने मोठी कारवाई केली आहे. जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णीचा भाजप नेता व १५ शाळांचा संचालक संजय गरुड याला सोलापूरजवळील नातेपुते येथून सोमवारी ताब्यात घेतले. गुन्हा दाखल झाल्यापासून ते फरार होते.

गरुड याने संस्थेतील १७७ शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी एकाच दिवसात तयार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या संशयास्पद आयडींच्या आधारे मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. सखोल तपासासाठी गरुडला मंगळवारी नाशिक न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची मागणी केली जाणार आहे.

राज्यात गाजत असलेल्या बहुचर्चित बनावट ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात विशेष तपास पथकाने शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि भाजपचे नेते संजय गरुड यांना अटक केल्याने प्रचंड खळबळ उडाली असून अजून काही संस्थाचालकांना अटक करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

संजय गरूड यांना नाशिक एसआयटीच्या पथकाने सोलापूरजवळील नातेपुते येथून एका फ्लॅट मधून ताब्यात घेतले आहे. ते चकवा देत होते. गरुड यांच्या शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेतील तब्बल १७७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी अवघ्या एका दिवसात तयार करण्यात आले होते. या बनावट आणि संशयास्पद आयडींच्या आधारे मोठ्या प्रमाणावर शासकीय निधीचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा पोलिसांना संशय आहे. या अनुषंगाने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात निवृत्त शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांच्या अटकेनंतर ही दुसरी सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. गरूड यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांच्या अटकेनंतर संजय गरूड यांना करण्यात आलेली अटक महत्वपूर्ण मानली जात असून अजून काही मोठे संस्थाचालक आणि शिक्षण अधिकारी एसआयटीच्या रडारवर आहेत.

संजय गरूड हे राजकीय, सामाजिक आणि शैक्षणीक क्षेत्रातील मातब्बर व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपली कारकिर्दी काँग्रेसपासून सुरू केली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते सक्रीय होते. त्यांनी तीन वेळेस जामनेर विधानसभा निवडणूक लढविली होती. संजय गरुड या आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा त होते त्यांनी ३० जानेवारी २०२६ रोजी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!