भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

ब्रेकिंग : आता वर्षातून दोन वेळा होणार १० वी ची बोर्ड परीक्षा, “या ” बोर्डाने घेतला मोठा निर्णय

मुंबई,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | केंद्रीय माध्यमिक शिक्षण (सीबीएसई) मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांची आता वर्षातून दोन वेळा परीक्षा होणार आहे.

सीबीएसई बोर्ड परीक्षा २०२६ पासून दरवर्षी दोन वेळा होणार
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) सन २०२६ पासून दहावीच्या विद्यार्थ्यांना एका शैक्षणिक सत्रात दोन वेळा परीक्षा देण्याची मुभा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पहिला टप्पा १७ फेब्रुवारी ते ६ मार्च या कालावधीत आणि दुसरा टप्पा ५ ते २० मे या दरम्यान पार पडला आहे. दोन्ही परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावरच आधारित असतील आणि उमेदवारांना समान परीक्षा केंद्रे देण्यात येणार आहेत.

या दोन्ही परीक्षा पुरवणी परीक्षा म्हणूनच घेतल्या जाणार असून, कोणत्याही परिस्थितीत विशेष परीक्षा घेण्यात येणार नाहीत, असे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांमध्ये बसण्याचा पर्याय उपलब्ध असेल. जर पहिल्या प्रयत्नातील गुणांवर विद्यार्थी समाधानी असतील, तर दुसऱ्या टप्प्यात त्या विषयांची परीक्षा न देण्याचाही पर्याय त्यांना असेल.

सीबीएसईने या नव्या धोरणाच्या मसुद्याला मंजुरी दिली असून, तो लवकरच सार्वजनिक करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!