फार्मासिस्ट आणि केमिस्ट वेल्फेअर असोसिएशन च्या नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
मुंबई, मंडे टु मंडे न्युज | फार्मासिस्ट आणि केमिस्ट यांच्या हक्क, कल्याण व व्यावसायिक प्रगतीसाठी समर्पित PCWA च्या नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे.
Pharmacist and Chemist Welfare Association (PCWA) ही फार्मासिस्ट आणि केमिस्ट यांच्या हक्कांचे संरक्षण, व्यावसायिक विकास, सामाजिक सुरक्षा आणि संघटनात्मक बळकटीसाठी कार्यरत असलेली संघटना असून, संघटनेच्या विस्तारासाठी विविध भागांमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
PCWA चे संस्थापक अध्यक्ष श्री. मयुरेश नरेंद्र कोल्हे यांनी खालील पदाधिकाऱ्यांची अधिकृत नियुक्ती जाहीर केली आहे.
संस्थापक अध्यक्ष
श्री. मयुरेश नरेंद्र कोल्हे – संस्थापक अध्यक्ष, PCWA
संस्थापक सदस्य
श्री. स्वप्निल जगदाळे
श्री. सचिन शिंदे
श्री. विशाल पाटील
कु. कल्याणी वाघ
विभागीय अध्यक्ष
श्री. पद्माकर येवले – नवी मुंबई विभाग प्रमुख
शहराध्यक्ष
श्री. दत्तात्रय शहाजी वाघमारे – पिंपरी चिंचवड
सौ. अश्विनी अभिजीत गायकवाड – साऊथ मुंबई
श्री. योगेश चौधरी – कल्याण
श्री. संतोष पांडुरंग कदम – नाशिक
श्री. भूषण राठोड – नागपूर
श्री. प्रसाद विकास पाटील – जळगाव
श्री. अजय पाचपांडे – वरणगाव
या सर्व नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांचे संस्थापक अध्यक्ष श्री. मयुरेश नरेंद्र कोल्हे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली संबंधित शहर व विभागांमध्ये PCWA चे कार्य अधिक जोमाने वाढेल, फार्मासिस्ट व केमिस्ट यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रभावी प्रयत्न होतील आणि संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी त्यांनी राज्यभरातील फार्मासिस्ट व केमिस्ट बांधवांना PCWA सोबत जोडून संघटना अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले.
“एकता • सेवा • सक्षमीकरण • प्रगती” या ब्रीदवाक्यासह PCWA फार्मासिस्ट आणि केमिस्ट यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने कार्यरत राहील, असेही त्यांनी सांगितले.


