भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

वेश्या व्यवसायावर नशिराबाद पोलिसांची धडक कारवाई ; दोन आरोपी जेरबंद, दोन पीडित महिलांची सुटका

नशिराबाद, दि. २१ जुलै : मंडे टु मंडे न्युज.डॉ.दीपक लोखंडे | नशिराबाद पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे वेश्या व्यवसायावर धडक कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून दोन पीडित महिलांची सुटका केली आहे. या कारवाईत एकूण ९१ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सहायक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, नशिराबाद येथून सुनसगावकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या एका शेतात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि. २१ जुलै) दुपारी सुमारे २.२० वाजता पोलिस पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री करून संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईदरम्यान प्रदीप जनार्दन रोटे (वय ५७) व कैलास संजय भोई, दोघेही रा. नशिराबाद, हे वेश्या व्यवसायासाठी महिलांकडून कुंटणखाना चालवत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत दोन पीडित महिलांची सुटका केली.

या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम ३, ४, ५ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि योगिता नारखेडे करीत आहेत.

ही कारवाई जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलिस अधिकारी भरत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात पोहेकॉ गुणवंत देशमुख, प्रशांत विराणे, भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, सागर बिडे, प्रवीण लोहार व भूषण पाटील यांचा समावेश होता.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!