भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमफैजपूरयावल

फैजपूरमध्ये घरफोडी! बंद घराचे कुलूप तोडून १ लाख ९० हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

फैजपूर, मंडे टु मंडे न्युज || यावल तालुक्यातील फैजपूर शहरातील आशिष सराफ नगरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. घराच्या दरवाजाची कडी-कोंडी तोडून घरात प्रवेश करत चोरट्याने लोखंडी कपाटात ठेवलेले सुमारे १ लाख ९० हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरक्षेसाठी ठेवलेले दागिने चोरट्याने केले लंपास
मिळालेल्या माहितीनुसार, भालोद येथील धनराज मनोहर बडगुजर यांच्या बहिणीचे घर फैजपूर शहरातील आशिष सराफ नगरात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने धनराज बडगुजर यांनी सोन्या-चांदीचे दागिने आपल्या बहिणीच्या घरी ठेवले होते. मात्र, घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने दरवाजाची कडी-कोंडी तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले दागिने चोरून नेले. चोरी झालेल्या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे १ लाख ९० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

फैजपूर पोलिसांत गुन्हा दाखल
या प्रकरणी धनराज मनोहर बडगुजर यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद गाभणे पुढील तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!