भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

फटाके विक्रीत नियम धाब्यावर, फटाके विक्रेत्यांवर कारवाईचा इशारा

जळगाव, मंडे टु मंडे न्युज ||जळगाव जिल्ह्यात फटाके परवाने रद्द झालेले असताना आणि प्रकरणे न्यायप्रविष्ट असतानाही काही विक्रेत्यांकडून छुप्या पद्धतीने फटाके विक्रीचे प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर, जळगाव जिल्हा प्रशासनाने नियमबाह्य फटाके विक्री करणाऱ्यांवर थेट आणि कडक कायदेशीर कारवाई करण्याचा तीव्र इशारा दिला आहे.

प्रशासनाने काही त्रुटींमुळे किंवा सुरक्षेच्या कारणास्तव ठराविक फटाके विक्रेत्यांचे परवाने रद्द केले आहेत. हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित (न्यायप्रविष्ट) आहे.

न्यायालयाचा अंतिम निर्णय येण्याआधीच किंवा अधिकृत परवानगी नसतानाही, काही व्यावसायिक सणासुदीच्या काळात छुप्या मार्गाने नियमबाह्य फटाके विकण्याचा प्रयत्न करत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत.

जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, विनापरवाना किंवा बंदी असलेल्या ठिकाणी फटाके साठवणे आणि विकणे हा गंभीर गुन्हा आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करता अशा विक्रेत्यांवर थेट गुन्हे दाखल केले जातील आणि त्यांचा माल जप्त केला जाईल. तसेच ज्या फटाक्यांवर बंदी आहे ते फटाके विक्री करू नये. असा इशारा निवासी उप जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी दिला असून या बाबत जिल्ह्यातील सर्व तालुका मॅजिस्ट्रेट ,सब डिव्हिजन मॅजिस्ट्रेट, पोलिस अधीक्षक, प्रांत,व त्या त्या ठिकाणचे पोलिस विभागीय अधिकारी आदींना या संदर्भात सुचविले असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!