जेडीसीसी बँक निवडणुकी साठी विकासभाऊ उखर्डू नारखेडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
जळगाव.मंडे टु मंडे न्युज || जळगाव नागरी सहकारी पतपेढीचे चेअरमन श्री. विकासभाऊ उखर्डू नारखेडे यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (JDCC Bank) निवडणुकीत इतर सहकारी संस्था गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी त्यांच्यासोबत संदीपभाऊ नेवे, प्राध्यापक रडे सर, अनिल नेमाडे साहेब, मुकुंदा बऱ्हाटे साहेब, उद्योजक सुनील माळी साहेब, समाधान अहिरे साहेब, प्रकाश पाटील साहेब, मिलिंद बेंडाळे साहेब यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक मंडळ, सभासद मंडळ आणि हितचिंतकांचा मोठा समुदाय उपस्थित होता.
या प्रसंगी उपस्थितांनी विकासभाऊ नारखेडे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सहकार क्षेत्रातील अनुभव, पारदर्शक कारभार आणि सर्वसामान्य सभासदांच्या हितासाठी काम करण्याची भूमिका यामुळे त्यांच्या उमेदवारीकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. सहकाराची ताकद, विश्वासाची साथ आणि विकासाचा ध्यास!


