भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

अमळनेरक्राईमजळगाव

८४ हजारांची मागणी, ५० हजारांची लाच घेताना ग्रामपंचायत अधिकारी जळगाव एसीबी च्या जाळ्यात

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | १२ लाख रुपयांचे बिल मंजूर केल्याच्या मोबदल्यात सात टक्के प्रमाणे एकूण ८४ हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती ५० हजारांची लाचा स्वीकारताना अमळनेर तालुक्यातील नगाव बुद्रुक येथील ग्रामपंचायत येथील ग्राम विकास अधिकारी रवींद्र देविदास पवार. वय ४८ वर्ष. यांना जळगाव एसीबीने गुरुवारी सायंकाळी राहत्या घरातून अटक केल्याने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांचे चुलत भाऊ यांना १५ वा वित्त आयोग अंतर्गत नगाव बु ता. अमळनेर येथे सि.सी गटार बांधकाम करण्याचे व पेव्हर ब्लॉक बसविण्याचे १२,००,०००/- रुपयांचे दोन कामांचे टेंडर मिळाले होते. सदर कामांचे १२,००,०००/-रुपयांचे बिल मंजुर करुन दिल्याचा मोबदला म्हणून सदर रक्कमेच्या ७ टक्केप्रमाणे रविंद्र देविदास पवार. वय ४८ वर्षे, ग्रामपंचायत अधिकारी नगाव बु, ता. अमळनेर जि. जळगांव. यांनी तक्रारदार यांना दि.२४.०४.२०२६ रोजी ८४,०००/- रुपये लाच रक्कमेची मागणी केली होती.

त्यानंतर तक्रारदार यांनी दि. ३०.०४.२०२६ रोजी ला.प्र.वि. जळगांव यांच्याकडे तक्रार केली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने पंचासमक्ष अमळनेर शहरातील केलेनगर येथील रवींद्र पवार यांच्या राहत्या घरी लाचमागणी पडताळणी केली असता यातील रवींद्र पवार यांनी तक्रारदार यांच्याकडे एकुण कामाच्या ७ टक्के प्रमाणे प्रथम ८४,०००/-रुपये लाचेची मागणी करुन त्यापैकी १३,०००/- रुपये यापुर्वीच फोन पेवर स्विकारले असल्याचे मान्य करुन तडजोडी अंती ५०,०००/- रुपये लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वतच्या घरी स्विकारतानां मिळून आला, म्हणुन रविंद्र देविदास पवार वय ४८ वर्षे, व्यवसाय नोकरी, ग्रामपंचायत अधिकारी नगाव बु, ता. अमळनेर जि. जळगांव. खाते-जिल्हा परिषद, वर्ग ३. यांच्याविरुध्द अमळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सदर कारवाई पर्यवेक्षण अधिकारी श्री योगेश ठाकूर, पोलीस उप अधिक्षक, सापळा अधिकारी: श्री. हेमंत नागरे, पोलीस निरीक्षक. तपास अधिकारी:- श्रीमती स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक. सापळा पथकः पोउपनिरी/दिनेशसिंग पाटील, पोउपनिरी/सुरेश पाटील पोहेका/बाळु मराठे, पोहेका/किशोर महाजन, पोहेका/सुनिल वानखेडे, पोकों/भूषण पाटील, पोकों/मनोज पाटील, पोकों/प्रणेश ठाकुर, पोकों/अमोल सुर्यवंशी, पोकों/सचिन चाटे यांनी यशस्वी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!