नवदाम्पत्यांचा असाही उपक्रम : विवाह प्रसंगी दृष्टिहीन दिव्यांग बांधवांना विशेष काठी दान
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | श्रीराज वायकोळे व कीर्ती टोंगळे यांचा २१ एप्रिल २०२६ रोजी सावदा येथे विवाह संपन्न झाला . या मंगल प्रसंगी विवाह निमित्त दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या मोबिलिटी ट्रेनिंग कॅम्प ला त्यांनी ब्लाइंड स्टिक दान करून सहकार्य केले . आपल्या आनंदाच्या प्रसंगी दिव्यांग बांधवांना अशा प्रकारची मदत करून आपली सामाजिक जाणीव त्यांनी जागृत ठेवली आहे विशेष म्हणजे दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या प्रत्येक सामाजिक उपक्रमात सौ नीता यशवंत वायकोळे व सर्व वायकोळे कुटुंब नेहमीच सहकार्य करीत असते .
वायकोळे परिवार हे वरणगाव (जळगांव) चे रहिवासी आहेत.
श्रीराज व कीर्ती यांना दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक ,अध्यक्ष डॉ.विशाल कोरडे सर व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला परिवारातर्फे पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या ! सौ.नीता वायकोळे म्हणाल्या प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरातील शुभकार्य प्रसंगी अशाप्रकारे दान करावे व आपल्या आनंदात दिव्यागांना ही सामील करावे अशी इच्छा प्रकट केली.
