भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

१ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सावदा नगरपालिके समोर अनधिकृत अतिक्रमणाच्या विरोधात नागरिकांचे उपोषण

सावदा, ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज  | मौजे सावदा येथे गट नंबर १२११/१२१२/ प्लॉट नंबर २समोर ८० फुट रोडलगत अनधिकृत पणे अतिक्रमण केले आहे त्यामुळे प्लॉट धारकनामे शेख कमरुद्दीन शेख उस्मान यांनी सन २०२३- ते आज पावेतो नगरपालिका मध्ये अनेक वेळा लेखी स्वरूपात तक्रार देऊनही कोणतीही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही तसेच उपोषण करता यांनी नगरपालिका मध्ये घर बांधण्यासाठी रितसर परवानगी सुद्धा घेतली आहे परंतु त्या जागे समोर अतिक्रमण केले असल्याने त्या ठिकाणी मटेरिअल गिट्टी . रेती . आसारी . सिमेंट टाकायला जागाच शिल्लक ठेवली नाही म्हणून तक्रारदाराला ना ईलाजाने लोकशाही मार्गाने उपोषणाला बसण्याची वेळ आली. 

उपोषणकर्ते शेख कमरुद्दीन यांच्या म्हणण्यानुसार जो पर्यंत माझ्या प्लॉट समोरील रस्त्यावर झालेल्या अनधिकृत पणे अतिक्रमण हटविले जात नाही तोपर्यंत मी उपोषण सोडविणार नाही तसेच या नगरपालिका प्रशासन जो पर्यंत लेखी स्वरूपात आश्वासन देत नाही हे उपोषण सोडले जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे .

उपोषणकर्ते यांची भेट घेण्यासाठी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ रेणुका पाटील व माजी नगराध्यक्ष राजेश भाऊ वानखेडे गटनेते तसेच गटनेत्या व नगरसेविका सौ. रंजना जितेंद्र भारंबे, नगरसेवक शाम अकोले, आरोग्य सभापती सौ प्रतीक्षा भंगाळे नगरसेविका व नगरसेवक विशाल भाऊ तायडे व नगरसेवक हेमा महाजन यांनी भेट देऊन तोंडी आश्वासन दिले की लवकरच आम्ही अजेंडा घेऊन विषय घेऊन कार्यवाही करु या कारणांमुळे नगरपालिका प्रशासन व माननीय जिल्हा अधिकारी सो जळगाव काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!