अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठी समिती गठीत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश – आ. एकनाथराव खडसे यांच्या पत्राची दखल
मुक्ताईनगर,मंडे टु मंडे न्युज. अक्षय काठोके | शहरातील २०- २५ वर्षांपासून अतिक्रमण करून राहणाऱ्यांना स्वतःच्या नावाचा सात-बारा मिळावा या मागणीसाठी आ. एकनाथराव खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या अर्जाची दखल घेत अतिक्रमण नियमाकुल + करण्यासाठी समिती गठीत करण्याचे आदेश पत्र मुक्ताईनगर नगरपंचायतला जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहे.
मुक्ताईनगर येथे शेकडो कुटुंब मागील २०-२५ वर्षांपासून अतिक्रमित जागेवर कच्चे घर बांधून रहिवास करीत आहे. व नगर पंचायतीचा कर भरणा करीत आहे. नगरपंचायत स्थापने नंतर ज्यांचा स्वःताच्या मालकीचा सात-बारा उतारा आहे अश्या लाभ्यार्थ्यांना प्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ देण्यात येत आहे. मात्र, जे अतिक्रमित जागेवर तत्कालीन ग्रामपंचायतमध्ये भोगवटा लावून रहिवास करीत आहे त्यांना स्वःताच्या मालकीचा सात-बारा उतारा नसल्याने प्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ मिळत नाही.
मुक्ताईनगर नगरपंचायत अंतर्गत मागील २०-२५ वर्षांपासून अतिक्रमित जागेवर रहिवास करणाऱ्या कुटुंबांचे स्वतरःच्या नावाचा सात-बारा मिळावा म्हणून अशा कुटूंबाचे सर्वेक्षण करून प्रधान मंत्री आवास योजनेचा लाभदेण्यात यावा, अशी मागणी माजी मंत्री तसेच विधानपरिषदचे आ. एकनाथराव खडसे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्या पत्राची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपंचायत शाखेचे सहआयुक्त जनार्दन पवार यांनी मुक्ताईनगर नगरपंचायतीला अतिक्रमण नियमावली करण्यासंदर्भात समिती गठित करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आ. खडसे यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते यांनी दिली आहे.

