Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिकसावदा

दाऊदी बोहरा समाजाचे सर्वोच्च धर्मगुरू डॉ. मुफद्दल सैफुद्दीन साहेब यांचे सोमवार रोजी सावदा नगरीत आगमन ; बोहरा समाजात उत्साहाचे वातावरण!

सावदा. ता .रावेर. मंडे टु मंडे न्युज || दाऊदी बोहरा समाजाचे सर्वोच्च धर्मगुरू परमपूज्य हिज होलीनेस डॉ. मुफद्दल सैफुद्दीन साहेब यांचे सोमवार, दि. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील ऐतिहासिक सावदा शहरात आगमन होणार आहे. या विशेष आगमनाच्या पार्श्वभूमीवर सावदा शहरातील दाऊदी बोहरा समाजबांधवांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

धर्मगुरूंच्या स्वागतासाठी समाजाच्या वतीने विशेष तयारी करण्यात येत असून, शहरात ठिकठिकाणी स्वागताची लगबग सुरू आहे. त्यांच्या आगमनाचा क्षण अविस्मरणीय करण्यासाठी समाजातील विविध घटकांकडून नियोजन केले जात आहे. तसेच धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

परमपूज्य धर्मगुरूंचे दर्शन घेण्यासाठी समाजातील आबालवृद्धांमध्ये मोठी उत्सुकता असून, त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण बोहरा समाज एकवटला आहे. या ऐतिहासिक आगमनामुळे सावदा शहरात भक्तिमय आणि मंगलमय वातावरण अनुभवायला मिळणार असून, संपूर्ण समाजाचे लक्ष आता उद्याच्या आगमन सोहळ्याकडे लागले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!