भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमबोदवळमुक्ताईनगर

बोदवड शहर उद्यापासून बेमुदत बंद! गुंडगिरी, दहशत आणि चोरीच्या घटनांविरोधात नागरिकांचा एल्गार

१५ नोव्हेंबरपासून शहरातील व्यवहार बंद ; व्यापारी, शेतकरी, विविध राजकीय पक्ष आणि नागरिकांचा सहभाग

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज. अक्षय काठोके || बोदवड शहरासह तालुक्यात वाढत असलेल्या गुंडगिरी, दहशत आणि चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बोदवड शहरात रविवार, दि. १५ नोव्हेंबर २०२६ पासून बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे. शहरातील व्यापारी, महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या काही तरुणांच्या टोळक्यांवर आळा घालण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याचा आरोप करत नागरिकांनी हा निर्णय घेतला आहे.

शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, गुंडगिरी, दहशत, चोरीच्या घटना तसेच टोळक्यांकडून व्यापारी आणि महिलांना त्रास देण्याच्या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे बंदच्या आवाहनात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध नोंदवण्यासाठी शहर बेमुदत बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या बंदला बोदवड तालुक्यातील नागरिक, व्यापारी संघटना, शेतकरी आणि विविध राजकीय पक्षांनी सहभाग दर्शविला असल्याचे आवाहनकर्त्यांनी म्हटले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला निषेध नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गांधी चौकातून निघणार मूकमोर्चा

रविवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता बोदवड येथील गांधी चौकातून मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात तालुक्यातील समस्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, बेमुदत बंदच्या या निर्णयामुळे बोदवड शहरातील जनजीवन आणि व्यापारी व्यवहारांवर काय परिणाम होतो, तसेच पोलीस प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!