जळगाव जिल्ह्याला भूकंपाचे धक्के नवीन नाहीत! १९३८ मध्ये ६.१ तर १९९३ मध्ये ६.२ तीव्रतेच्या भूकंपाची नोंदसातपुडा ते तापी खोऱ्यातील भूगर्भीय हालचालींकडे लक्ष
जळगाव.मंडे टु मंडे न्युज || मध्य प्रदेशातील खरगोन परिसरात झालेल्या भूकंपाचे सौम्य धक्के शनिवार १४ नोव्हेंबर २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील काही भागांत जाणवल्यानंतर पुन्हा एकदा जिल्ह्याच्या भूकंपविषयक इतिहासाची चर्चा सुरू झाली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील रावेर, भुसावळ, चोपडा, यावल, वरणगाव व मुक्ताईनगर केंद्रबिंदू शेजारील मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात होता. कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. याची तीव्रता ४.५ रिस्टल स्केल होती.
जळगाव जिल्हा आणि परिसरात यापूर्वीही अनेकदा सौम्य ते मध्यम स्वरूपाचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. विशेष म्हणजे, १४ मार्च १९३८ रोजी जळगाव जवळ ६.१ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद भूगर्भीय इतिहासात असल्याचे नमूद केले जाते.
यात जळगावच्या नैऋत्येस सुमारे ६० किमी (सातपुडा पट्टा) गेल्या शतकातील जळगाव परिसराजवळील हा सर्वात मोठा भूकंप मानला जातो. याची तीव्रता ६.१ रिस्टल स्केल होती.
अलीकडच्या काळातही जिल्ह्यात भूकंपाच्या घटना घडल्या आहेत. १ सप्टेंबर २०२६ रोजी रावेर तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमधील मोहगण परिसरात ३.३ तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली सुमारे पाच किलोमीटर खोलीवर होता. हा भूकंप रावेर तालुका (सातपुडा पर्वतातील मोहगण परिसर) ३.३ जमिनीखाली ५ किलोमीटर खोलीवर केंद्रबिंदू होता. सौम्य धक्के जाणवले.
यापूर्वी २७ जानेवारी २०२३ रोजी भुसावळ परिसरातही सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला होता. जळगाव परिसर जमिनीखाली १० किलोमीटर खोलीवर केंद्रबिंदू असलेला अतिशय सौम्य स्वरूपाचा २.७ रिस्टल स्केल होता.
तसेच २५ जुलै २०१९ मध्ये उत्तर महाराष्ट्र परिसराला भूकंपाचे हादरे बसले होते. जळगाव व उत्तर महाराष्ट्र परिसर ४.८ केंद्रबिंदू जळगावच्या नैऋत्येस (पालघर परिसरात) होता. जळगावमध्ये सौम्य हादरे जाणवले.
२६ जानेवारी २००१ मधील गुजरातच्या कच्छ येथील विनाशकारी ७.७ रिस्टर स्केल भूकंपाचे धक्केही जळगाव जिल्ह्यात जाणवले होते. संपूर्ण जळगाव जिल्हा (केंद्रबिंदूवर) गुजरातच्या कच्छ (भुज) येथील महाभूकंपाचे जोरदार धक्के जळगाव जिल्ह्यातही जाणवले होते.
३० सप्टेंबर १९९३ संपूर्ण जळगाव जिल्हा (केंद्रबिंदूवर) लातूर (किल्लारी) येथील विनाशकारी ६.२ रिस्टर स्केल
भूकंपाचे धक्के जळगाव जिल्ह्यातही बसले होते.
भूकंपप्रवण क्षेत्रात जळगाव जिल्ह्याचा समावेश
भारतीय मानक ब्युरोच्या (BIS) भूकंपविषयक वर्गीकरणानुसार भारताचे झोन-२ ते झोन-५ असे चार भूकंप क्षेत्र निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये झोन-२ हा तुलनेने कमी, तर झोन-३ हा मध्यम भूकंपधोका दर्शवतो. जळगाव जिल्ह्याच्या भूकंपविषयक जोखमीच्या पार्श्वभूमीवर बांधकाम करताना भूकंपरोधक निकषांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
विशेषतः तापी नदीचे खोरे आणि सातपुडा पर्वतरांगांचा परिसर यातील भूगर्भीय हालचालींमुळे या भागात अधूनमधून भूकंपाचे धक्के जाणवत असल्याचे दिसून येते. त्यामुळे नवीन इमारती, निवासी संकुले आणि सार्वजनिक बांधकामे उभारताना भूकंपरोधक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
नागरिकांनी घाबरू नये; मात्र सतर्क राहावे!
शनिवारी सकाळी जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. भूकंपाच्या घटनांबाबत अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत यंत्रणांकडून मिळणारी माहिती आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
खरगोन परिसरातील भूकंपाचे हादरे जळगाव जिल्ह्यापर्यंत पोहोचल्याने जिल्ह्याच्या भूकंपविषयक ऐतिहासिक नोंदी, भूगर्भीय हालचाली आणि भविष्यातील सुरक्षित बांधकामांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


