पत्रकार असल्याचे सांगत पाच लाखांची खंडणीची मागणी : दोन तोतया पत्रकारांना अटक
जळगाव.मंडे टु मंडे न्युज | पत्रकार असल्याचे सांगत कारवाई टाळण्यासाठी तब्बल पाच लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी कोमल बापुराव पाटील आणि जितेंद्र रूपसिंग चौधरी या दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी रफीक कुरेशी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्याद दारांच्या तक्रारी नुसार, “तुमच्याकडे बंदी असलेले मांस आहे. तुमच्याविरुद्ध पोलिस कारवाई टाळायची असेल तर आम्हाला पाच लाख रुपये द्या; अन्यथा कारवाईला सामोरे जा,” अशी धमकी देत दोघांनी पैशांची मागणी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मागणीप्रमाणे पाच लाख रुपये न दिल्याने दोघांनी दिलेल्या माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचे तपासात समोर आले.
या प्रकरणी रफीक कुरेशी यांच्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध संबंधित कलमांनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय राजेंद्र उगले करीत आहेत. पत्रकार असल्याचे सांगत नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला गेल्याच्या या घटनेमुळे संपूर्ण जळगाव शहरात चर्चेला उधाण आले आहे.


