भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

बुलढाणामहाराष्ट्र

शेतकऱ्यांची चिंता वाढली : दुबार पेरणीचं संकट, पावसाची स्थिती संमिश्र, यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी कसोटीचा, भेंडवळची भविष्यवाणी

बुलढाणा, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | २०२६ च्या एप्रिल महिन्यातील हवामानाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात खरीप हंगामात दुबार पेरणीचे गंभीर संकट उभे राहिले आहे. राज्यात पावसाची स्थिती संमिश्र आणि अनिश्चित असून, जूनमधील अपुऱ्या पावसामुळे बियाणे वाया जाण्याची भीती आहे. भेंडवळची प्रसिद्ध भविष्यवाणी २०२६ जाहीर झाली असून, यंदा पावसाचे प्रमाण संमिश्र, काही भागात अतिवृष्टी व महापूर तर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पावसाचा खंड पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी कसोटीचा ठरणार आहे.

जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्यास दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. सुरुवातीच्या पावसावर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना या अनिश्चिततेचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. भेंडवळीच्या भाकितात यंदा पिकांवर रोगराईचे प्रमाण जास्त राहणार असल्याचे भाकीत वर्तवण्यात आले आहे. यंदा कापूस पिकाला रोगराईचा धोका असून तरीही कापूस पीक साधारण येईल, मात्र त्याला बाजारभाव चांगला मिळेल. गहू, हरभरा, वाटाणा, मटकी आणि मसूर ही पिके सर्वसाधारण सरासरी राहतील.तर तूर पिकाची स्थिती अनिश्चित असेल. मूग साधारण येईल, पण भाव चांगले राहतील. बाजरीचे पीक चांगले येईल. उडीद आणि अंबाडीवर रोगराईचा मोठा प्रादुर्भाव दिसेल.

भेंडवळची भविष्यवाणी: बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध भेंडवळ घटमांडणीनुसार, यंदा पीक-पाणी सामान्य असेल, पण मंदीचे सावट राहील.  सोयाबीन, ज्वारी, तुरीला योग्य भाव न मिळण्याची भीती आहे.
पेरणीत घाई टाळा: जमीन ओलिताखाली आल्याशिवाय किंवा पावसाचा चांगला अंदाज आल्याशिवाय पेरणी करू नका.

हवामान विभागाने (IMD) यंदा मान्सून सरासरीच्या ९२% (सामान्यपेक्षा कमी) राहण्याचा (पावसाचा संमिश्र अंदाज) अंदाज वर्तवला आहे, ज्यामुळे ३१ जिल्ह्यांत दुष्काळाची धास्ती आहे.

गेल्या ३७० वर्षांपासून शेतकरी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात, ती बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध भेंडवळची घटमांडणी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पार पडली. चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी आज सूर्योदयाच्या वेळी या मांडणीचे निष्कर्ष जाहीर केले. यंदा पाऊस पाणी कसा राहणार? पिकाला भाव मिळणार का? कोणत्या पिकावर रोगराई येणार? अतिवृष्टी होणार का? या सर्व प्रश्नांचे उत्तर देणारी भेंडवळची घटमांडणी आज जाहीर झाली. यंदाच्या भाकितानुसार पावसाची स्थिती संमिश्र राहणार असून, शेतकऱ्यांसाठी आनंदासोबतच चिंतेची माहिती समोर आली.

यंदाच्या भेंडवळाच्या घटमांडणीच्या भाकितानुसार पावसाची स्थिती चढ-उताराची राहणार आहे. पावसाचे चार महिने कसे असतील, याची माहितीही समोर आली आहे पावसाचा पहिला महिना अत्यंत कमी पावसाचा असेल. यामुळे सुरुवातीच्या पेरण्यांना विलंब होऊ शकतो किंवा दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. दुसऱ्या महिन्यात पाऊस साधारण स्वरूपाचा राहील, ज्यामुळे पिकांना उभारी मिळेल. एकूणच भेंडवळच्या भाकिता नुसार यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी कसोटीचा ठरणार असल्याचे पाहायला मिळत आहे. अतिवृष्टी आणि रोगराई या दोन संकटांशी झुंज देत शेतकऱ्याला शेती करावी लागेल. या काळात चारा-पाण्याची टंचाई भासणार नाही. हाच मोठा दिलासा असेल, असे संकेत या भेंडवळ च्या मांडणीतून मिळताना दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!