Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राच्या चार सुरक्षा रक्षकांवर हल्ला; कोळसा चोरी रोखल्याचा रागातून मारहाण

भुसावळ.मंडे टु मंडे न्युज || दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील कोळसा व इतर साहित्याची चोरी रोखल्याने तसेच यापूर्वी चोरीप्रकरणी गुन्हा दाखल केल्याच्या रागातून चार सुरक्षा कर्मचाऱ्यांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवार, १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ६.३० वाजेदरम्यान केंद्राच्या प्रतिबंधित क्षेत्रात हा प्रकार घडला. या हल्ल्यात चार सुरक्षा रक्षक जखमी झाले असून, याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसांत सहा नामजद संशयितांसह अन्य सहा अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा रक्षक संतोष नथ्थू खैरनार हे गुरुवारी सायंकाळी आपल्या सहकाऱ्यांसह दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरात गस्त घालत होते. यावेळी पिंप्रीसेकम गावाच्या शिवारातील औष्णिक केंद्राच्या रेल्वे उड्डाणपुलापासून फुलगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुमारे ५०० मीटर अंतरावर संशयितांनी त्यांना गाठले. मनोज विश्वनाथ कोलते, धीरज संजय सोनवणे, प्रथमेश तायडे, बंटी बाबुराव सोनवणे, संजय रवींद्र कोळी आणि जितेंद्र संजय शिंदे यांच्यासह अन्य सहा अनोळखी व्यक्तींनी लाठ्या-काठ्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या घटनेत फिर्यादी संतोष खैरनार यांच्यासह भैयासाहेब मोरे, शुभम घनगर आणि अमोल राठोड हे चार सुरक्षा रक्षक जखमी झाले.

चोरीप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचा राग?
दीपनगर केंद्रात यापूर्वी साहित्य चोरी केल्याप्रकरणी संबंधित संशयितांविरोधात भुसावळ तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच औष्णिक विद्युत केंद्रातून कोळसा व इतर साहित्याची चोरी करण्यास सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून प्रतिबंध होत असल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

या प्रकरणी सहा नामजद संशयितांसह अन्य सहा अनोळखी व्यक्तींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास हवालदार हेमंत मिटकरी करीत आहेत. दीपनगर केंद्राच्या प्रतिबंधित क्षेत्रात सुरक्षा कर्मचाऱ्यांवर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!