क्राईमनंदुरबार

पोलीस अधिकाऱ्याला लाच घेताना अटक, अटकेच्या समर्थनार्थ पोलिसस्टेशन समोरच गावकऱ्यांचा मोठा जल्लोष

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. या बातमीनं मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस अधिकाऱ्याने पन्नास हजार रुपये लाच घेतल्याने त्याला अटक करण्यात आली, विशेष म्हणजे अधिकाऱ्याला अटक केल्याने गावकऱ्यांनी पोलीसस्टेशन समोरच अटकेच्या समर्थनार्थ मोठा जल्लोष केला. ही घटना नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर पोलीसस्टेशनची असून, पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याला  लाच घेताना अटक करण्यात आलं आहे. ज्ञानेश्वर लक्ष्मण वारे.वय – 49 वर्ष, पोलीस निरीक्षक, नवापूर पो.स्टे.रा. फ्लॅट नंबर 6, बी विंग, आशर इस्टेट, उपनगर, नाशिक रोड, नाशिक. असं लाच घेणाऱ्या लाचखोर अधिकाऱ्याचं नाव आहे. खोटे गुन्हे दाखल करून लाच घेत असल्याचाही या अधिकाऱ्यावर आरोप होत आहे. नाशिकच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांचे यांचेवर सोनगड पोलीस स्टेशन, जिल्हा तापी, राज्य – गुजरात येथे गुन्हा रजिस्टर नंबर  583/2023 प्रमाणे प्रोव्हीबिशन चा गुन्हा दाखल झाला होता सदर  गुन्ह्याचे तपासकामी (एल. सी. बी. तापी, गुजरात राज्य)  पोलीसांचे पथक नवापूर पोलीस स्टेशन, जिल्हा नंदुरबार येथे आले त्यावेळी नवापूर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर वारे यांनी सोनगड पोलीस स्टेशन, जिल्हा तापी राज्य गुजरात चे गुन्ह्यामध्ये  मध्यस्थी करून अटकेपासून बचाव होणेकामी मदत केल्याचे मोबदल्यात त्यांनी तक्रारदार यांचे मित्र यांच्याकडे तक्रारदार यांच्यामार्फत 2,50,000/-  रुपये  लाचेची ची मागणी केली होती.त्यावेळी तक्रारदार यांनी  भीतीपोटी  दि 05/03/2024 रोजी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना  1,00,000/- रुपये लाच म्हणून दिले होते त्यानंतर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी 1,50,000/- रुपये अधिक लाचेची मागणी करून दिनांक 24/04/2024 रोजी लाचेची मागणी पडताळणी  दरम्यान तडजोड अंति 50,000/- रुपये लाचेची ची मागणी करून पंचा समक्ष मागणी केलेली लाचेची रक्कम 50,000/- रुपये स्वीकारले आहे. त्यांचेवर नवापूर पोलीस स्टेशन, जिल्हा नंदुरबार येथे गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.

ज्ञानेश्वर वारेच्या अटकेची बातमी कळताच गावकऱ्यांनी नवापूर पोलीस ठाण्यात कारवाईच्या समर्थनार्थ मोठी गर्दी केली. वारे विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तक्रारदाराच्या विरोधात गुजरातच्या हद्दीमध्ये दाखल गुन्ह्यांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी वारेने लाचेची मागणी केली होती. या प्रकरणात सापडा रचून त्याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं आहे. नाशिकच्या अँटीकरप्शन विभागाकडून नंदुरबारच्या नवापूर पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली आहे.सापळा अधिकारी*
*श्री संदीप बबन घुगे , पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक*
मो.नं. 8605111234
▶️ *सापळा पथक*-                                                  
*पोलीस नाईक/ गणेश निंबाळकर*
  *पोलीस शिपाई / नितीन नेटारे*
*सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक* .

सापळा अधिकारी श्री संदीप बबन घुगे , पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक सापळा पथकात  पोलीस नाईक/ गणेश निंबाळकर
पोलीस शिपाई / नितीन नेटारे सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!