भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

हातभट्टीच्या दारूला अधिकृत मान्यता द्या, म्हणजे…; रामदास आठवलेंचा सल्ला

मुंबई,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असतात. सोमवारी भिवंडी दौऱ्यावर असताना त्यांनी हातभट्टीच्या दारूबाबत अजब मागणी केली आहे. सहज उपलब्ध होणारी हातभट्टीची दारू अधिकृत करा, यामुळे शासनाला महसूल मिळेल आणि गोरगरिबांचे जीव वाचतील, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं. हे आपलं वैयक्तित मत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

पुणे येथे नुकतीच विषारी दारू प्यायल्यामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.येथे विषारी दारू पिण्यामुळे गोरगरिब कुटुंबातील मजूर कामगार यांचा मृत्यू झाला. हातावर पोट असणारा समाज हातभट्टीची दारू पितो. माझं वैयक्तिक मत आहे की, हातभट्टीची दारू शासनमान्य अधिकृत करा. ज्यामुळे हातभट्टी ही सर्वसामान्य मजूर वर्गाला परवडणारी असेल. त्यावर शासनाचे हातभट्टीवर नियंत्रण राहील. शासनाला महसूल मिळेल व गोरगरिब मजूर वर्गातील लोक जगतील. किती ही कारवाया केल्यानंतर हातभट्टीची दारू सहज उपलब्ध होते. त्यासाठी हातभट्टी दारू अधिकृत करा, शासनाचे नियंत्रण राहिल्याने महसूल ही मिळेल, असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी भिवंडीमध्ये प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना म्हटलं.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!