भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्य

राज्यात उष्णतेची लाट, हवामान विभागाचा धोक्याचा इशारा, अवकाळी नंतर तापमानाचं संकट

पुणे, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |राज्यावर अवकाळीच्या संकटानंतर आता तीव्र तापमानाचं संकट उभे ठाकले आहे. आता एप्रिलमध्ये पुन्हा तीव्र उन्हाळा जाणवत आहे. बहुतांश भागात तापमान चाळिशीच्या घरात गेलं आहे. कमाल तापमान सामान्यापेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. काही भागांत उष्ण आणि दमट स्थिती तर काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्या मुळे नागरिकांनी जास्तीत जास्त पाणी प्यावे.

महाराष्ट्रात १४ एप्रिल २०२६ पासून उष्णतेची लाट तीव्र होणार असून, हवामान विभागाने धोक्याचा इशारा दिला आहे. वाढत्या तापमानामुळे राज्य सरकारने दुपारी १२ ते ४ या वेळेत कामगारांसाठी काम बंद ठेवण्याचे (Midday Work Halt) आदेश दिले असून, नागरिकांना आपल्या आरोग्यासाठी  दुपारी घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.

धोक्याचा अलर्ट: येत्या आठवड्यात कोकण, मुंबई, ठाणे आणि रायगडसह संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, काही ठिकाणी तापमान ४५°C पर्यंत जाण्याची शक्यता आहे. कामगारांसाठी सरकारने बांधकाम, उद्योग आणि फेरीवाल्यांसाठी दुपारी काम बंद (12 pm – 4 pm) अशी नवी SOP (Standard Operating Procedure) जारी केली आहे. १४ एप्रिलपासून पुढील काही दिवस विविध जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्रात हवामान कोरडे आणि उष्ण राहील. तापमानाचा पारा चढत असून आज कमाल तापमान ३८- ४२ अंशांवर जाण्याची शक्यता आहे. नाशिकसह अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत येत्या २ दिवसांत जवळपास ३ अंशांपर्यंत तापमानात वाढ होऊ शकते.

विदर्भातील नागपूर, अमरावती भागात देखील कमाल तापमान ४३ अंशांच्या पार गेले आहे. विशेषत: अकोलासारख्या ठिकाणी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. १५ एप्रिलपासून विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा धाका आहे.मध्य महाराष्ट्रात देखील उन्हाळा तापदायक ठरत आहे. आकाश निरभ्र तर हवामान कोरडे राहील. येथेही उष्णतेचा पारा ४० अंशांच्या पार जाण्याची शक्यता आहे.पुण्यासह सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापुरात कमाल तापमान ३८ – ४१ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. विशेषत: सांगली, सोलापुरात उष्णतेच्या लाटेचा धोका आहे.

त्याच प्रमाणे छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्याचा विचार केला तर, कमाल तापमान ३८- ४२ अंशांच्या दरम्यान राहील. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात अंगाची लाही लाही करणारी उष्णता आहे. हवामान उष्ण आणि कोरडे राहील. १६ एप्रिलपासून मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून तापमान ४३% अंशांच्या पार जाईल.

राज्यात आज पासून उष्णतेचा पारा चढणार असून येत्या २- ३ दिवसांत बहुतांश महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रातील किनारी भागात उष्ण आणि दमट हवामानाचा अलर्ट तर उर्वरित महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा धोका आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!