भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

अवघ्या १० महिन्यांच्या निष्पाप चिमुकल्या लेकीची बादलीत पाण्यात बुडवून हत्या ; आई की राक्षसीण? मन सुन्न ! परिसर हादरला…..

मंडे टु मंडे न्युज | पतीकडून होत असलेल्या कथित छळाला कंटाळून एका २६ वर्षीय महिलेने आपल्या अवघ्या १० महिन्यांच्या मुलीची बादलीत पाण्यात बुडवून हत्या केल्याची मन सुन्न करून हेलावून टाकणारी  घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे  उघडकीस आली. यानंतर तिने सहा वर्षांच्या मोठ्या मुलीलाही ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

आरोपी महिलेचे नाव पूजा योगेश खुर्दामळे (वय २६) असून मृत चिमुकलीचे नाव शक्ती (वय १० महिने) आहे. मोठी मुलगी तेजल (वय ६ वर्षे) सुदैवाने बचावली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती कामावर गेल्यानंतर आरोपी महिलेने प्रथम चिमुकलीचा गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर तिने मोठ्या मुलीलाही ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, आई…. मी शाळा शिकते..मला मारू नको..अशी मुलीच्या आर्त विनंतीनंतर तिने हा प्रयत्न थांबवल्याने मुलीची जीव वाचला.

विशेष म्हणजे या घटनेनंतर आरोपी महिला मृत चिमुकलीला घेऊन थेट बार्शी शहर पोलीस ठाण्यात पोहोचली. तेथे तिने पतीच्या त्रासाला कंटाळून मुलीची हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी बार्शी शहर पोलिसांनी पूजा खुर्दामळे हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) आणि १०९ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!