क्राईमचोपडाजळगाव

खळबळजनक ; तरुणीला धमकावत तिच्यावर चौघां नराधमांचा पाशवी अत्याचार

जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। तरुण मुलीला धमकावून तिच्यावर चार नराधमांनी पाशवी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली, सदरची तरुणी ही चोपडा तालुक्यातील असून अडावद पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे.

या बाबत मिळालेली माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील रहिवासी असलेल्या तरुणीच्या घरात घुसून तरुणीवर गफूर गबू तडवी याने २ जानेवारी रोजी दुपारी जबरजस्ती अत्याचार केला. तसेच दि ४ जानेवारी रोजी तिला धमकी देऊन यावल येथे बोलावले. येथे अमोल शत्रुघ्न कोळी, पंकज बुधा कुंभार आणि प्रतीक राजेंद्र कोळी या तीन जणांनी धमकावत रात्री तिच्यावर अत्याचार केला.

या बाबत पिडीत तरूणीने दिलेल्या फिर्यादी वरून गफूर गबू तडवी, वय ३३, अमोल शत्रुघ्न कोळी, वय २३, पंकज बुधा कुंभार, वय २६ , व प्रतीक राजेंद्र कोळी, वय २०, या चौघांच्या विरोधात अडावद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या चारही आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास अडावद पोलीस करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!