भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

ऐनपूर महाविद्यालयात क्रांतीसुर्या भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्ताने जनजाती गौरव दिवस संपन्न

रावेर. मंडे टु मंडे न्युज || रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात क्रांतीसुर्या भगवान बिरसा मुंडा यांची जयंती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे बी अंजने यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आली. प्रा डॉ एस ए पाटील व उपप्राचार्य डॉ एस एन वैष्णव हे प्रमुख वक्ते म्हणून लाभले.

सुरुवातीला क्रांतीसुर्या भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रा डॉ एस ए पाटील यांनी क्रांतीसुर्या भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मापासून त्यांच्या जीवन चरित्र विषयी माहिती समजावून सांगितली. डॉ एस एन वैष्णव यांनी क्रांतीसुर्या भगवान बिरसा मुंडा यांचे संघर्ष करून स्वतंत्र लढ्यातील योगदान याविषयी माहिती दिली.

तर अध्यक्षीय भाषणात मा. प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासींची परंपरागत जमीन व्यवस्था, जंगल आणि हक्कांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी लढा दिला तसेच स्वतंत्र लढ्यातील योगदान या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा हेमंत बाविस्कर यांनी केले तर आभार डॉ संदीप साळुंखे यांनी मानले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!