सहकार क्षेत्रात “विकास उखर्डू नारखेडे” यांना उत्स्फूर्त प्रतिसाद! ग्रामीण भागातून मिळतोय विजयाचा आशीर्वाद; शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या नेतृत्वाला सभासदांची पसंती!
जळगाव. मंडे टु मंडे न्युज || जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत इतर सहकारी संस्था गटातून उमेदवारी दाखल केलेले जळगाव नागरी सहकारी पतपेढीचे चेअरमन विकास उखर्डू नारखेडे यांनी आपल्या प्रचार दौऱ्याला वेग दिला असून, आसोदा, भादली, कडगाव, शेळगाव, साळवा, नांदेड, यावल आदी परिसरांमध्ये ते सहकारी संस्थांचे सभासद, मतदार आणि मान्यवरांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन आशीर्वाद घेत आहेत.
या दौऱ्यादरम्यान विकासभाऊ नारखेडे यांना सर्वच भागांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, त्यांच्या भेटीला सभासदांकडून सकारात्मक प्रतिसाद आणि विजयासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे सहकार क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले असून, ग्रामीण भागातील सभासदांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे, एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले, अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेले, तरुण, उमदे आणि संघर्षशील नेतृत्व आज जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न, सहकारी संस्थांच्या अडचणी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने आवाज उठवणारा प्रामाणिक कार्यकर्ता मिळत असल्याची भावना सभासदांमध्ये व्यक्त होत आहे.
सत्तेपेक्षा सेवा, पदापेक्षा जबाबदारी आणि राजकारणापेक्षा सहकार क्षेत्राचा विकास हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून विकासभाऊ नारखेडे यांची वाटचाल सुरू आहे. शेतकरी, कष्टकरी आणि सहकारी संस्थांच्या हितासाठी लढणाऱ्या या नेतृत्वाला जिल्हा बँकेत संधी मिळावी, अशी अपेक्षा अनेक सभासद व्यक्त करत आहेत.
ग्रामीण भागातून मिळणारा हा वाढता प्रतिसाद, सभासदांचे प्रेम आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद पाहता विकास उखर्डू नारखेडे यांच्या उमेदवारीने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नवी राजकीय समीकरणे निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
हा केवळ एका उमेदवाराचा विजयाचा प्रवास नाही, तर सहकार क्षेत्रात शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्याच्या नव्या आशेचा प्रवास आहे! असे सर्व परिसरात बोलले जात आहे
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

