भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिकसावदा

अखिल महाराष्ट्र कुंभार विकास संस्था,जळगाव जिल्हा संघटकपदी रविंद्र हिवरकर यांची निवड

सावदा.ता. रावेर.मंडे टु मंडे न्युज || अखिल महाराष्ट्र कुंभार विकास संस्था, महाराष्ट्र राज्य संस्था, जळगाव यांच्या वतीने सावदा येथील रविंद्र हिवरकर यांची जळगाव जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भुसावळ येथे आयोजित कुंभार समाज बांधवांच्या फलक अनावरण समारंभात अखिल महाराष्ट्र कुंभार विकास संस्था महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष श्री मोहन रावजी जगदाळे साहेब यांच्या हस्ते अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

रविंद्र हिवरकर यांनी यापूर्वी कुंभार समाज सावदा शहर अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. या कार्यकाळात त्यांनी समाजाच्या संघटनात्मक बांधणीसाठी तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम व कार्यांसाठी विशेष पुढाकार घेतला. समाजातील बांधवांना एकत्र आणणे, सामाजिक प्रश्नांमध्ये सक्रिय सहभाग घेणे आणि समाजाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणे, या त्यांच्या कार्याची दखल घेत संस्थेने त्यांच्यावर जळगाव जिल्हा संघटकपदाची जबाबदारी सोपविली आहे.

अखिल महाराष्ट्र कुंभार विकास संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील कुंभार समाजाचे संघटन अधिक मजबूत करणे, समाजबांधवांमध्ये समन्वय वाढविणे, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्नांसाठी प्रयत्न करणे आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणे, अशी जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे.

या नियुक्तीपत्रावर संस्थेचे प्रदेशाध्यक्ष बळवंत कुंभार साहेब, राज्य उपाध्यक्ष श्री.पद्माकर भाऊ शिरसाट आणि राज्य सचिव योगेश हिरवकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कार्यक्रमात उपस्थित श्री पद्माकर भाऊ शिरसाट, श्री धनलाल शेठ शिरसाट, श्री समाधान भाऊ कुंभार ,श्री राजेंद्र भाऊ खैरे श्री.समाधान भाऊ हिवरकर श्री.जनार्दन भाऊ कुंभार , श्री मोहन सावंदे श्री हर्षल प्रजापती ,इ.पदाधिकारी व मान्यवर होते श्री.रविंद्र हिवरकर यांच्या निवडीबद्दल सावदा शहरासह परिसरातील कुंभार समाज बांधवांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नियुक्तीमुळे समाजाच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!