भाजप तालुकाध्यक्षांच्या निवेदनालाच पोलिसांची केराची टोपली? कुऱ्हा-अंतुर्लीतील अवैध धंद्यांचा धुमाकूळ कायम; कारवाईचा अभाव, पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी : मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा-अंतुर्ली परिसरात कथित अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू असल्याच्या तक्रारी समोर येत असताना, आता थेट भाजप तालुकाध्यक्ष मोहन महाजन यांच्या निवेदनालाही पोलीस प्रशासनाने केराची टोपली दाखवली की काय? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

या परिसरातील अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी भाजप तालुकाध्यक्ष मोहन महाजन यांनी पोलीस प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. मात्र, निवेदन देऊनही अद्याप ठोस कारवाई झाल्याचे दिसत नसल्याने अवैध धंदेवाल्यांचे मनोबल वाढले आहे की काय, अशी चर्चा आता परिसरात रंगू लागली आहे.


सत्ताधारी पक्षाच्या तालुकाध्यक्षांच्या निवेदनाचीच दखल नसेल, तर सामान्य नागरिकांच्या तक्रारींचे काय?
हा प्रश्न आता अधिक गंभीर बनला आहे. सत्ताधारी पक्षाशी संबंधित पदाधिकाऱ्यालाच अवैध धंद्यांविरोधात पोलिसांच्या दारात जाऊन निवेदन द्यावे लागत असेल आणि त्यानंतरही परिस्थिती जैसे थे राहत असेल, तर सामान्य नागरिकांनी न्यायाची अपेक्षा तरी कुणाकडून करायची?
महाजन यांच्या निवेदनानंतर पोलिसांनी नेमकी कोणती चौकशी केली? संबंधित ठिकाणी छापे टाकले का? अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारींची शहानिशा झाली का? कारवाई झाली असेल तर तिचा तपशील सार्वजनिक का केला जात नाही? की निवेदन केवळ कागदावरच राहिले?

अवैध धंद्यांविरोधात घोषणा मोठ्या, पण प्रत्यक्ष कारवाईचा पत्ता नाही!
एकीकडे अवैध धंद्यांना आळा घालण्याच्या घोषणा केल्या जातात, तर दुसरीकडे तक्रारी आणि निवेदनांनंतरही परिस्थितीत बदल होत नसेल, तर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहणे स्वाभाविक आहे.
कायद्याचा धाक सामान्य नागरिकांनाच दाखवायचा आणि कथित अवैध धंद्यांवर मात्र कारवाईचा हात आखडता घ्यायचा, अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर ही बाब निश्चितच चिंताजनक आहे. आता पोलीस प्रशासनाने केवळ आश्वासनांवर न थांबता कुऱ्हा-अंतुर्ली परिसरातील कथित अवैध धंद्यांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


भाजप तालुकाध्यक्ष मोहन महाजन यांच्या निवेदनाची पोलीस प्रशासनाने दखल घेतली का? निवेदनानंतर कोणती चौकशी करण्यात आली? संबंधित अवैध धंद्यांवर कारवाई का झाली नाही? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
एकीकडे अवैध धंद्यांना आळा घालण्याच्या घोषणा केल्या जातात, तर दुसरीकडे तक्रारी आणि निवेदने देऊनही परिस्थितीत बदल होत नसेल, तर पोलीस प्रशासन नेमके करते तरी काय? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
आता तरी पोलीस प्रशासन जागे होणार का? की कुऱ्हा-अंतुर्ली परिसरातील अवैध धंद्यांना अभय मिळतच राहणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
निवेदनावर कारवाई कधी? नागरिकांना उत्तर मिळणार का?
आता तरी पोलीस प्रशासन जागे होणार की अवैध धंद्यांच्या तक्रारींवर केवळ कागदी घोडे नाचवले जाणार? हा प्रश्न संपूर्ण मुक्ताईनगर तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

