भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावधरणगाव

धक्कादायक! पोटच्या मुलानेच आईला केली मारहाण; उपचारादरम्यान ७३ वर्षीय वृद्धेचा मृत्यू

जळगाव. मंडे टु मंडे न्युज ||  घरगुती कारणावरून पोटच्या मुलानेच आपल्या वृद्ध आईला मारहाण केल्याची धक्कादायक घटना धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडे गावातून समोर आली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या ७३ वर्षीय आईचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सारीबाबी रसूल पटेल (वय ७३) असे मृत महिलेचे नाव असून, रशीद रसूल पटेल (वय ५५) असे आरोपी मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, धरणगाव पोलीस ठाण्यापासून जळगाव रोडने पूर्व दिशेला सुमारे १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या हनुमंतखेडे गावात ही घटना घडली. घरगुती कारणावरून मुलगा रशीद पटेल याने आई सारीबाबी पटेल यांना मारहाण केली. या मारहाणीत त्या गंभीर जखमी झाल्या.

घटनेनंतर जखमी वृद्धेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, या घटनेमागील नेमके कारण काय होते, मारहाणीचे स्वरूप आणि मृत्यूचे नेमके कारण याबाबत अद्याप अधिकृत तपशील समोर आलेला नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, तपासाअंती अधिक माहिती स्पष्ट होणार आहे.पोटच्या मुलाकडूनच आईवर झालेल्या मारहाणीच्या या घटनेने हनुमंतखेडे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!