भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

रावेर तालुक्यात खळबळ! अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा गुन्हा दाखल झालेल्या ६५ वर्षीय इसमाची रेल्वेखाली आत्महत्या

निंभोरा. ता. रावेर.मंडे टु मंडे न्युज || तालुक्यातील निंभोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत चार वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झालेल्या ६५ वर्षीय इसमाचा रेल्वेखाली आढळलेल्या मृतदेहामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सोमवार दि. ९ नोव्हेंबर च्या रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ६५ वर्षीय इसमावर शेजारी राहणाऱ्या चार वर्षांच्या चिमुरडीला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप होता. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून संबंधित इसमाचा शोध सुरू होता. मात्र, रात्रीच्या सुमारास त्याने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.

दरम्यान, संबंधित इसमाने नेमक्या कोणत्या परिस्थितीत हे टोकाचे पाऊल उचलले, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. या मृत्यूमागील परिस्थिती आणि इतर बाबींचा निंभोरा पोलीस तपास करीत असून, तपासाअंती अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे निंभोरा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!