भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरसामाजिक

“कलियागाचे भगवंत श्री जगन्नाथ-पार्थ सारथी प्रभुजी” मुक्ताईनगर येथे जगन्नाथ रथयात्रा महोत्सव संपन्न

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन )तर्फे मुक्ताईनगर शहरात पहिल्यांदाच श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक उत्सवाची सुरुवात सकाळी नऊ वाजता लेवा समाज मंगल कार्यालय जवळून झाली, भगवान जगन्नाथजी ,बलदेवजी व सुभद्रामाई रथावर आरूढ होउन सर्वांना दर्शन देण्यासाठी मार्गस्थ झाले.ही रथयात्रा केवळ एक शोभायात्रा नसून संपूर्ण मुक्ताईनगर शहराच्या भक्तीभावनेचा साक्षात्कार करणारी अशी होती.

रथयात्रेची सुरुवात लेवा समाज मंगल कार्यालय येथून -बस स्टॅन्ड परिसर- प्रवर्तन चौक- आनंद ट्रेडर्स- तहसील रोड या मार्गाने निघून समारोप हरे कृष्णा सत्संग केंद्र येथे करण्यात आला. यावेळी श्री जगन्नाथजी यांना 56 भोग अर्पण करून महाआरती करण्यात आली .

यावेळी इस्कॉन जळगाव केंद्राचे अध्यक्ष पार्थसारथी प्रभुजी यांचे प्रवचन झाले. त्यांनी कलियुगात हरिनामाचे महात्म्य विषद करून प्रभू जगन्नाथ जी यांच्या प्रकटनाबद्दल तसेच त्यांच्या लिला याबाबत भक्तांना मार्गदर्शन केले .

सदर कार्यक्रमास चैतन्य जीवन प्रभुजी, व्रजप्रेम प्रभू,उत्तम मोहन प्रभू, आदित्य वामन प्रभू, सर्व शक्तिमान प्रभू, गिरीधर गोपाल प्रभू ,पुंडरिकाक्ष प्रभू, धन्वंतरी प्रभू ,अविनाश प्रभू, गणपती दास प्रभू, रुक्मिणी विठ्ठल प्रभू अर्जुन केशव प्रभू, माधव प्रभू, कन्हैया प्रभू,दयाराम प्रभू,चैतन्य लीला प्रभू, चंद्रलेखा माताजी, महादेवी माताजी, मदालसा माताजी यांची प्रमुख उपस्थिती होती.

इस्कॉन मुक्ताईनगर केंद्रातर्फे केलेल्या आवाहनानुसार या उत्सवात जळगाव, भुसावळ,वरणगाव, मलकापूर,निमखेडी, जुनोना,मेंढोळदे,माळेगाव, वरणगाव या गावांमधून व स्थानिक पाचशे पेक्षा जास्त भक्तगण सहभागी झाले होते.शहरातील विशेषतः माताजी भक्त मंडळी यांनी श्री जगन्नाथजीं रथयात्रेसाठी वस्त्र सजावट, फुलांच्या माळा, महाप्रसाद व 56 प्रकारच्या भोगांची तयारी या सेवांमध्ये सहभाग घेतला. यशस्वीतेसाठी सुहास बिरारी ,अविनाश पाटील, हेमंत सुतार,विकी सनांसे हरीओम इंगळे, आत्माराम सावकारे ,अनमोल कोळी,हेमंत माळी, जितेंद्र सपकाळे यांचे सह मुक्ताईनगर येथील भक्तांनी परिश्रम घेतले

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!