भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

फैजपूर – भुसावळ रोडवर भीषण अपघात, बुलेट – बस ची समोरासमोर धडक, एक ठार एक गंभीर

फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रविवार दिनांक २९ जून रोजी संध्याकाळी फैजपूर – भुसावळ दरम्यान पाडळसा गावा जवळील मराठा मटण हॉटेल जवळ वळणावर बुलेट मोटरसायकल क्रमांक एम.एच.१९ इ.एफ.७७०४ व बस क्रमांक एम.एच.१४ एम.एच.१०८३ नंबर ची एस टी बसची समोरासमोर झालेल्या धडक मध्ये बुलेट मोटरसायकल वरील मयूर श्रीराम गवळी वय ३० वर्ष. रा. शिवाजीनगर जळगाव. हा तरुण जागीच ठार झाला. तर जयेश सुधाकर पाटील व चिरायू मनोज गोहर या दोघे जखमीं झाले असून या पैकी एक जण गंभीर जखमी आहे. तिघे बुलेट स्वार जळगाव येथील शिवाजीनगर शिवाजी नगर येथील रहिवासी आहेत.

बुलेटवर तिघे जण बसून फैजपूर कडून जळगाव कडे जात होते. दोघा जखमींना जळगाव सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. रावेर डेपोची एस. टी. बस. ही पंढरपूर हून रावेर कडे येत होती.

या घटने दरम्यान अकलूद व पाडळसा मधील पेट्रोल पंपा जवळ रस्त्यावर वादळामुळे भले मोठे बाभूळी चे कोलमडले होते.  त्यामुळे रस्त्यावर शेकडो वाहनांची ट्राफिक जाम झालेली होती. त्या मुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झालेला होता.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!