भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

वरणगाव मध्ये गुटखा तस्करांवर मोठी कारवाई, मुद्देमालासह ५ लाख १७ हजारांचा गुटखा जप्त

वरणगाव, ता. भुसावळ. मंडे टु मंडे न्युज | भुसावळ तालुक्यातील वरणगाव मध्ये गुटखा तस्करांवर मोठी कारवाई करण्यात आली. त्यात मुद्देमालासह ५ लाख १७ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. राज्यात प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याची वाहनातून वाहतूक होणार असल्याची माहिती वरणगाव पोलिसांनी मिळाली होती . मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून एका वाहनातून गुटखा, पान मसाला आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थांसह २ लाख ६८ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. व वाहन मिळून एकूण ५ लाख १७ हजार ८६८ रुपये किंमतीचा मुद्देमाल आणि वाहतुकीसाठी वापरलेले इनोव्हा वाहन जप्त करण्यात आले.

एका वाहनातून गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती वरणगावचे सहाय्यक निरीक्षक अमितकुमार बागुल यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी पथक तयार करून त्यांच्या निर्देशानुसार पथकाने शुक्रवार, २४ जुलै २०२६ रोजी रात्री ८.२० वाजेच्या सुमारास सापडा रचत इनोव्हा वाहन क्रमांक एम.एच.२० बी.डी.३००० हे आल्यानंतर तिची पंचांसमक्ष झडती घेतल्यानंतर त्यात राज्यात प्रतिबंधीत असलेला पानमसाला व तंबाखू जप्त करण्यात आला. या प्रकरणी अन्न व सुरक्षा अधिकारी योगराज सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहन चालक चेतन लक्ष्मण नारखेडे (28, रा. नशिराबाद, जि. जळगाव) यांचे विरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!