आज आषाढी एकादशी, पंढरीची वारी, महत्व,भगवान विष्णूंची योगनिद्रा, शुभ मुहूर्त ते पारणाची वेळ! पौराणिक कथा…
मंडे टु मंडे न्युज | आषाढी एकादशी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र सण आहे, ज्याला देवशयनी एकादशी आणि पंढरपूरची वारी असेही म्हणतात. हा आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला येतो. या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात चार महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात अशी धार्मिक श्रद्धा आहे.
धार्मिक महत्त्व आणि चातुर्मास
या दिवशी देव चार महिने झोपतात, म्हणून याला देवशयनी एकादशी म्हणतात. या तिथीपासून ‘चातुर्मास’ सुरू होतो. या काळात शुभ कार्ये काही काळ थांबवली जातात आणि धार्मिक व आध्यात्मिक अनुष्ठान केले जाते.भाविक या दिवशी अन्न ग्रहण न करता कडक उपवास करतात आणि विष्णू व विठ्ठलाची पूजा करतात.
पंढरपूरची वारीची परंपरा:
महाराष्ट्राच्या विविध भागांतून लाखो वारकरी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व इतर संतांच्या पालख्यांसोबत पायी चालत पंढरपूरला पोहोचतात. आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाकाठी देशभरातून वारकऱ्यांचा महापूर लोटतो. जात-पात, ऊच-नीच असा कोणताही भेद न मानता सर्व वारकरी ‘ज्ञानबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल-विठ्ठल’ नामाचा गजर करत या सोहळ्यात आनंदाने सहभागी होतात.
आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी, ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे. हा वारकरी सांप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला ‘देवशयनी आषाढी एकादशी’ असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.
सर्वात पवित्र व्रतांपैकी एक आहे. या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात चार महिन्यांच्या योगनिद्रेसाठी जातात. यामुळे या दिवसापासून चातुर्मासास प्रारंभ होतो. हे व्रत आत्मशुद्धी आणि मनःशांती प्रदान करते.
आषाढी एकादशीला वारकरी संप्रदायात सर्वोच्च स्थान आहे. वर्षभर विविध संतांच्या पालख्या पायी चालत आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या चरणी लीन होतात.
चातुर्मासाची सुरुवात: या दिवसापासून सुरू होणाऱ्या चार महिन्यांच्या काळात (चातुर्मास) साधू-संत एकाच ठिकाणी राहून तपश्चर्या आणि नामस्मरण करतात.या दिवशी उपवास करून विष्णू आणि विठ्ठलाची मनोभावे पूजा केली जाते. अशी श्रद्धा आहे की या दिवशी उपवास केल्याने सर्व पापांचे क्षालन होते आणि भक्ताला सुख-समृद्धी लाभते.
आज आषाढी एकादशी,
26 जुलैला साजरी होणारी आषाढी एकादशी हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाची एकादशी मानली जाते.
विठ्ठल भक्तांची प्रतिक्षा अखेर संपणार आहे, कारण आज म्हणजेच 26 जुलै 2026 रोजी आषाढी एकादशीचा सण साजरा होणार आहे. ज्या भक्तांना विठुरायाच्या दर्शनाची आस लागली होती, ती अखेर आता संपणार आहे, वैदिक पंचांगानुसार, आषाढ शुक्ल एकादशीला येणारी आषाढी एकादशी जिला देवशयनी एकादशी असेही म्हणतात, ही एकादशी हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाची एकादशी मानली जाते. महाराष्ट्रात या दिवसाला विशेष स्थान असून, लाखो वारकरी पायी चालत पंढरपूर येथे भगवान विठ्ठल-रुक्मिणींच्या दर्शनासाठी जातात. भगवान विठ्ठल आणि आषाढी एकादशी यांचे नाते अतूट मानले जाते. पण या एकादशीला इतके महत्त्व का आहे? भगवान विष्णूंची योगनिद्रा, पंढरीची वारी, शुभ मुहूर्त ते पारणाची वेळ! महत्त्व, पौराणिक कथेसह संपूर्ण माहिती जाणून घेऊया…
आषाढी एकादशीला इतके महत्त्व का आहे?
आषाढी एकादशी म्हणजे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायासाठी हा वर्षातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव आहे. या दिवशी लाखो वारकरी “ज्ञानोबा-तुकाराम“चा जयघोष करत पंढरपूरमध्ये भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी एकत्र येतात. हा केवळ एक धार्मिक सण नसून, भक्ती, समता, सेवा आणि वारकरी परंपरेचे प्रतीक आहे. भगवान विठ्ठलाच्या चरणी श्रद्धा अर्पण करून नामस्मरण, उपवास आणि सत्कर्म केल्याने आध्यात्मिक उन्नती साधता येते, अशी हिंदू धर्मातील प्राचीन श्रद्धा आहे.
भगवान विष्णू योगनिद्रेत का जातात?
धार्मिक मान्यतेनुसार, आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात चार महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात. या दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते. कार्तिक शुक्ल एकादशी (प्रबोधिनी एकादशी) रोजी भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होतात.
पंढरपूरची वारी
आषाढी एकादशी हा दिवस भगवान विठ्ठलाच्या भक्तीसाठी सर्वात पवित्र मानला जातो. या दिवशी नामस्मरण, हरिपाठ, भजन, कीर्तन आणि अभंगगायन यांना विशेष महत्त्व असते. महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा असलेल्या आषाढी वारीचे या दिवशी समापन होते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपुरात दाखल होतात. “ज्ञानोबा-तुकाराम“च्या जयघोषात लाखो वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतात. शेकडो वर्षांपासून सुरू असलेली ही वारी भक्ती, समता, सेवा आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक मानली जाते. लाखो वारकरी टाळ-मृदंगाच्या गजरात, अभंग म्हणत पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात.
आषाढी एकादशी 2026 तिथी, शुभ मुहूर्त
आषाढी एकादशीचे व्रत करताना तिथी आणि पारणाची वेळ जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते.
एकादशी तिथी प्रारंभ : 24 जुलै 2026 सकाळी 9:15 वाजताएकादशी तिथी समाप्त : 25 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 11:35 मिनिटांनी..
पारणाची वेळ
व्रताचे पारण: 26 जुलै 2026 सकाळी 5:30 ते 8:30 या वेळेत करणे शुभ मानले जाते.
पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार, पुंडलिक हा आपल्या आई-वडिलांची अत्यंत भक्तिभावाने सेवा करत होता. त्याच्या मातृ-पितृसेवेने प्रसन्न होऊन भगवान विष्णू त्याला दर्शन देण्यासाठी आले. त्या वेळी पुंडलिक आई-वडिलांच्या सेवेत व्यस्त असल्यामुळे त्याने भगवानांना थोडा वेळ थांबण्याची विनंती केली आणि त्यांच्यासमोर एक वीट फेकली. भगवान त्या विटेवर उभे राहून पुंडलिकाची वाट पाहू लागले. याच रूपाला आज विठ्ठल किंवा विठोबा म्हणून ओळखले जाते. पंढरपूरातील विठ्ठलाची मूर्ती आजही विटेवर उभी असल्याचे दर्शन घडते.
या दिवशी विठ्ठलाची पूजा का विशेष मानली जाते?
भगवान विठ्ठलाचे दर्शन अत्यंत पुण्यदायी मानले जाते.
नामस्मरण, हरिपाठ, अभंगगायन आणि भजन-कीर्तनाला विशेष महत्त्व असते.
उपवास, दान आणि सात्त्विक आचरण केल्याने आध्यात्मिक लाभ होतो, अशी श्रद्धा आहे.
वारकरी संप्रदायात हा दिवस भक्ती, समर्पण आणि सेवाभावाचा सर्वोच्च उत्सव मानला जातो.
या दिवशी काय करावे?
पहाटे स्नान करून भगवान विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करावी.
शक्य असल्यास एकादशीचे उपवास किंवा फलाहार करावा.
‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ किंवा ‘श्री विठ्ठलाय नमः’ या मंत्राचा जप करावा.
हरिपाठ, विष्णुसहस्रनाम, भगवद्गीता किंवा अभंगांचे पठण करावे.
गरजू व्यक्तींना अन्नदान, वस्त्रदान किंवा इतर दानधर्म करावा.
दिवसभर सात्त्विक आचरण ठेवून ईश्वरभक्तीत वेळ घालवावा.
आषाढी एकादशीचे आध्यात्मिक महत्त्व
आषाढी एकादशीचे आध्यात्मिक महत्त्व पाहता या दिवशी केलेली उपासना, जप, दान आणि नामस्मरण यांचे विशेष पुण्य प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. मनातील नकारात्मक विचार दूर होऊन मानसिक शांती, संयम आणि भक्तीभाव वाढतो. या दिवसापासून सुरू होणारा चातुर्मास हा साधना, व्रत, स्वाध्याय आणि सात्त्विक जीवन जगण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो.


